नवरात्र भवानी
करिते वंदन तुला भवानी
नतमस्तक मी चरणापाशी
कृपा प्रसादे सदैव लयलूट
धनधान्याच्या करते राशी
तूच पार्वती तूच भवानी
अग्रभागी तव मान पुजेचा
शांत,संयमी,नजरेमधूनी
दे मज आशिष तव शक्तीचा
गिरीजा तू अन् तूच पार्वती
तुझ्या कुशीतील आम्ही बालके
भ्रष्टाचारी या दुनियेतील
नको सोडू तू आम्हा पोरके
जगदंबा तू तूच शारदा
ज्ञानार्जन कर ज्ञानसंपदा
शिवगौरी तू समर्थ देवी
नकोच कुठली इथे आपदा
तुळजापूरची भवानीमाता
कोल्हापूरची अंबाबाई
शिवरायांची रक्षणकर्ती
मनी मानसी वसते आई
प्रा.मानसी जोशी
(ठाणे)