Home

रायगड जिल्हा शाळा ज्ञानवाडी येथे सेंद्रिय परसबाग बहरली


 रायगड जिल्हा शाळा ज्ञानवाडी येथे सेंद्रिय परसबाग बहरली


आलिबाग (वार्ताहर)

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत रायगड जिल्हा परिषद शाळा, ज्ञानवाडी (ता. आलिबाग) येथे सेंद्रिय परसबाग विकसित करण्यात आली असून तिच्या माध्यमातून शालेय पोषण आहाराला सकस आणि ताज्या भाज्यांचा पुरवठा सुरू झाला आहे.

या उपक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नेहा भोसले, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सौ. ललिता दहीतुळे यांच्या प्रेरणा लाभली. गटशिक्षणाधिकारी श्री. सुनील गवळी, विस्तार अधिकारी श्री. के.आर. पिंगळा यांचे मार्गदर्शन तसेच माजी गटशिक्षणाधिकारी श्री. नितीष पाटील व केंद्रप्रमुख सौ. मनिषा टेमकर यांचे मोलाचे योगदान या परसबागेच्या निर्मितीत लाभले.

परसबागेत वांगी, भेंडी, मिरची, टोमॅटो, पडवळ, कारले, भोपळा, शिराळा अशा विविध फळभाज्या, कोंथिंबीर, मेथी, माठ यांसारख्या पालेभाज्या, पपई, केळी, पेरू, जांभुळ यांसारखी फळझाडे तसेच तुळस, गवतीचहा, कोरफड यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे तुळशींच्या मोठ्या प्रमाणावरील लागवडीमुळे ऑक्सिजन पार्क देखील उभारण्यात आले आहे.

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा अजित भगत यांच्या नेतृत्वाखाली परसबागेतील भाज्यांचा वापर करून विद्यार्थ्यांना दररोज पौष्टिक आहार देण्यात येतो. या उपक्रमात शाळेतील शिक्षकवृंद, व्यवस्थापन समिती, विद्यार्थी-पालक यांच्यासह सौ. सविता नाईक, सौ. यामिनी पाटील, सौ. मनिषा पाटील आणि केंद्र शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. निलीमा पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

या परसबागेमुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा, स्वावलंबन व पर्यावरणपूरक दृष्टीकोन विकसित होत आहे. तसेच पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून शाळेचे परिसरही आनंदमय बनले आहे.

Previous Post Next Post