आठवणीच्या डोहात
काव्य प्रकार..षडाक्षरी
कधी एकेकाळी,
आस असायची!
पोस्टमन काका,
यांना भेटण्याची...
लहानपणीच्या,
त्या आठवणीत,
पोहोचले पार,
मी साठवणीत...
पिवळे पाकीट,
गूंफत राहिले!
निःशब्द होऊन,
आसू ओघळले...
आज पोस्टमन,
येत असूनही!
हरवली वाट,
त्यांची कुठूनही..
वाणी वेणूमाधव केरकलमट्टी..
(अमेरिका..)