Home

वन विभागाची मोठी कारवाई !!! अवैध्दरित्या शिसव वृक्ष तोड करणाऱ्यांवर सापळा रचून मुद्देमालासह केले चोरट्यांना अटक 


वन विभागाची मोठी कारवाई !!! अवैध्दरित्या शिसव वृक्ष तोड करणाऱ्यांवर सापळा रचून मुद्देमालासह केले चोरट्यांना अटक 

  

अलिबाग(प्रतिनिधी)

अलिबाग तालुक्यातील चौल भोवाळे श्री दत्‍त मंदिर परिसर जंगलभागातून अवैध्यरित्या शिसव वृक्ष तोड करणारांस फॉरेस्ट वनाधिकारी यांनी सापळा रचून मुद्देमालास चोरटयास अटक केली. 

याबाबत सविस्तर वृत्‍त असे की, नागाव फॉरेस्ट वनाधिकारी यांना दि. 10 जुन 2025 रोजी रात्रीचे सुमारास अज्ञात इसमाने मौजे चौल भोवाळे येथील श्री दत्‍त मंदिर परिसरातील जंगलभागात अवैध्यरित्या वृक्ष तोड करून वाहनाने वाहतुक करीत असल्याची गुप्त बातमी दिली. वनविभाग वनाधिकारी यांनी त्वरील घटनास्थळी जाउन मनोज सुभाष खारकर रा. चौल, राकेश किसन भोईर रा. चौल, अजय अनंत शेळके रा. चौल या तिन संशयीताना ताब्यात घेवून चौकशी केली असता,सरकारी जंगलातून एक शिसव प्रजापतीचे वृक्ष अवैध्दरित्या तोड करून काही मुद्देमाल हा माधव मुंकूद बापट रा. चौल यांचे घरी वाहनाचे पोहच केल्याचे सांगितले. सदर प्रकरणी वनविभागाने कारवाईत मौजे चौल संरक्षीत वन गट नं. 2713 येथून 7 घ.मी. 0.568 आकाराचे  अंदाजे 2548 रूपये किमंतीचे एकूण 7 शिसव नग व माधव मुंकूद बापट यांचा रहाते घराचे पाठीमागील बाजूस 07 घ.मी. 0.408 आकाराचे अंदाजे 1749 रूपये किमंतीचे शिसव वृक्षाचे 7 नग असे एकूण 14 शिसव नग मुद्देमाल जप्त केला. तसेच यामध्ये चोरीचा मुद्देमाल वाहतुकीस वापरलेले   टाटा/एसीई /एम 06/ए जी/ 8853 हे वाहन जप्त करण्यात आले.

 यामधील आरोपी मनोज सुभाष खारकर यांच्या माड तोडण्याचा व विकण्याचा व्यवसाय असून अनेकदा मालकी क्षेत्रात बांधनकारक वृक्ष अवैध्यरित्या तोडून विक्री करीत असे, तसेच साथीदार राकेश किसन भोइर सरकारी मालकी जागेतील झाडे शोधून मागणी प्रमाणे शोधून यांची माहिती मनोज खारकर यांना देत असे. तसेच अवैध्यरित्या तो्रडलेला माल अजय शेळके यांच्या मालकीच्या वाहनातून वाहतुक करीत असे. वनविभाग अनेक दिवस त्यांचा मागे होते, अखेर गुप्त माहिती प्राप्त होताच त्याना  मुद्देमालासह अटक करण्यात आले. यातील माधव बापट यांना त्यांचे घरातील फर्निचर साठी शिसव लाकडाची गरज असल्याने त्यांने मनोज खारकर यांचेकडे सदर लाकडाची मागणी केली होती अशी माहिती स्थानिक वनाधिकारी मौलेश तावडे यांनी दिली. 

याबाबत  मनोज सुभाष खारकर, राकेश किसन भोईर,  राकेश किसन भोईर, अजय अनंत शेळके, व चोरीचा मुद्देमाल खरेदी करणार माधव मुकूंद बापट यांचे विरोधात भारतीय वनअधिनियम 1927 चे कलम 33/1/अ,41, 52/1 नुसार चौल सी-4/25 हा गुन्हा दाखल केला असून सर्व आरोपीस वैयक्‍तीक 500 रूपये बंधपत्रावर तात्पुरता जामीन दिला आहे. या गुन्हातील जप्त मालमत्‍तेची माहिती माननीय न्यायालय अलिबाग यांना वनविभागाने दिली आहे. सदर गुन्हाचा सखोल तपास सुरू आहे. सदर कारवाईत उपवनसंरक्षक भाउसाहेब जवरे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेंद्र पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक वनाधिकारी मौलेश तावडे, उदय हटवार, विजय पाटील, प्रभाकर भोईर, दत्‍ता कोळेकर वॉचमन कर्मचारीवर्ग यांनी धडक मोहिम राबविली. 

Previous Post Next Post