बच्चू कडु जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र
मुंबई (प्रतिनिधी)
गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा देऊनही कृषीमंत्र्यांना मंत्रीपदावर सध्या कायम ठेवलं जातं ,असेच अनेक विध्यमान मंत्री आहेत ज्यांच्या वर घोटाळ्याचे आरोप होऊन त्यांच्यावर न्यायालयाने विविध वर्षांच्या शिक्षा सुनावल्या व काहींनी ती भोगल्या सुद्धा ते आज मंत्रीपदावर विराजमान आहेत,
मात्र शेतकरी व अपंग यांच्या हितासाठी केलेल्या आंदोलनामुळं न्यायालयाने सुनावलेल्या १ वर्षाच्या शिक्षेचं कारण देत बच्चू भाऊ कडू यांना विभागीय सहनिबंधक यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदावरून अपात्र ठरवलं.यात महत्त्वाची बाब अशी की ज्या आंदोलनामुळं न्यायालयाने मा.बच्चूभाऊ कडू यांना सुनावलेल्या १ वर्षाच्या शिक्षेला वरच्या कोर्टाने स्थगिती दिलेली आहे ,अंतिम निकाल येईपर्यंत त्यांना ती १ वर्षांची शिक्षा लागू होत नव्हती,मग ज्या शिक्षेच्या संदर्भ देऊन अपात्र ची कारवाई केली ती शिक्षाच लागू होत न्हवती तर अपात्रेची करवाई केली तरी कशाच्या आधारावर…यात सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्याचा आवाज दाबण्याची सरकारची हुकूमशाही आहे. ‘चूप बैठ नहीतो कान काटुंगा’ अशा पद्धतीनं वागणारं हे सरकारच सूड उगवत असेल तर हे लोकशाहीला अत्यंत घातक आहे. याविरोधात बच्चू भाऊ कडू हे आवाज उठवतीलच ..
