ओमकार नागावकर २०२५च्या आदर्श व्यक्तिमत्व पत्रकार पुरस्काराने सन्मानीत.
अलिबाग(सचिन पाटील)
महाराष्ट्र राज्य ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल व दै.लोकांकीतच्या ९ वर्धापन दिन सोहळा निमित्त आद्यक्रांतीविर वासुदेव बळवंत फडके नाटयगृह, पनवेल, येथे भव्य वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. त्यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला जपणाऱ्या लावण्या आणि ऑकेस्ट्राचा आर्कर्षित नजराणा आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर मराठी पत्रकार राज्य पुरस्कार किशोर आबीटकर, गारगोटी, नानासाहेब जोशी स्मृती राज्य पुरस्कार वैभव पाटील, पांडुरंग नंदराम भटकर मूकनायक पत्रकारिता पुरस्कार दत्तात्रय उकिरडे अहिल्यानगर, मधुकर लोंढे स्मृती ग्रामीण वार्ताहर पुरस्कार दीपक घोसाळकर, स्व. शरददादा बोरकर ग्रामीण कार्यकर्ता राज्य प्रेरणा पुरस्कार संतोष ढोरे, पनवेल, कर्तव्यदक्ष अधिकारी राज्यस्तरीय पुरस्कार सुनील आटपाडकर, एमएमआरडीए प्राधिकरणात सामाजिक विकास अधिकारी, मुंबई, दलितमित्र रमाकांत आर्ते स्मृती सामाजिक कार्यकर्ता राज्य पुरस्कार बजरंग सोनवणे, मुंबई, वरिष्ठ पत्रकार नवीन सोष्टे स्मृती विभागीय पत्रकार प्रेरणा पुरस्कार निलेश नवघरे, अकोट, मधु रावकर पत्रकार प्रेरणा पुरस्कार दयानंद मांगले, देवगड, जयानंद मठकर स्मृती विभागीय मराठी पत्रकार पुरस्कार प्रकाश वळंजू, राजापूर यांना जाहीर झाला आहे.
समाजकार्य, पत्रकारिता, शैक्षणिक क्षेत्र आणि इतर सामाजिक योगदानाबद्दल निवड करण्यात आलेल्या व्यक्तींना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना ‘उत्कृष्ट विद्यार्थी’ पुरस्कार देण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या पत्रकारांमध्ये आदर्श व्यक्तिमत्व पत्रकार पुरस्काराने ओमकार नागावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी आंतरराष्ट्रीय पत्रकार जतिन देसाई यांनी आपल्या भाषणांतून समाजात सकारात्मक बदल घडवणाऱ्यांचे योगदान अधोरेखित केले आणि अशा पुरस्कार कार्यक्रमांमुळे समाजात चांगल्या कार्याला प्रेरणा मिळते, असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय जेष्ठ पत्रकार जतिन देसाई, नांजीभाई ठक्कर ठाणेवाला, पुण्यनगरी संपादक शैलेश शिर्के आणि अनेक मान्यवर सोहळ्यास उपस्थित होते.
