Home

"स्टेजवर फीत, पण पक्षप्रवेश नाही!” – रचना गोपाळेंचा शिवसेनेच्या कार्यक्रमावर थेट खुलासा; काँग्रेसमध्येच ठाम असल्याची ठोस भूमिका


 "स्टेजवर फीत, पण पक्षप्रवेश नाही!” – रचना गोपाळेंचा शिवसेनेच्या कार्यक्रमावर थेट खुलासा; काँग्रेसमध्येच ठाम असल्याची ठोस भूमिका"


मुरूड (प्रतिनिधी) 

भोईघर ग्रुप ग्रामपंचायतमधील बार्शिव गावातून निवडून आलेल्या सदस्य सौ. रचना अमित गोपाळे यांनी शिवसेनेच्या कार्यक्रमात आपला पक्षप्रवेश झाल्याचा पसरवला जात असलेला गैरसमज जोरदार शब्दांत फेटाळून लावला आहे. शुक्रवार, दिनांक ९ जानेवारी रोजी झालेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमाला केवळ मैत्रिणींसोबत उपस्थित असताना, कोणतीही पूर्वकल्पना न देता स्टेजवर बोलावून गळ्यात पक्षाची फीत घालण्यात आली. 


        मात्र हा पक्षप्रवेश नसून, त्यामागे माझा कोणताही निर्णय किंवा इरादा नव्हता, असे स्पष्ट स्टेटमेंट सौ. गोपाळे यांनी दिले आहे. राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणाऱ्या या घटनेवर त्यांनी ठाम भूमिका घेत सांगितले की, “मी २०२३ मध्ये ग्रुप ग्रामपंचायत भोईघरच्या निवडणुकीत सुभाष महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने निवडून आले असून, आजही काँग्रेस (आय) पक्षातच आहे आणि यापुढेही राहणार आहे.”


         बिनसंमतीने फीत घालून पक्षप्रवेशाचा आभास निर्माण करणे हे चुकीचे असून, जनतेसमोर सत्य मांडणे आवश्यक असल्यानेच हे स्पष्टीकरण दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राजकारणात “दिसतं तसं नसतं” हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारी ही घटना भोईघर परिसरात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे.

Previous Post Next Post