जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2026 जाहीरदि .5 फेब्रुवारीला मतदान तर दि.7 फेब्रुवारी रोजी होणार मतमोजणी
रायगड-अलिबाग,दि.14(जिमाका)
:- मा.राज्य निवडणूक आयोगाने दि.13 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका-2026 जाहीर केला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व त्याअंतर्गत 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 करिता सविस्तर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून रायगड जिल्ह्यात 59 गट, 118 गण असून 2 हजार 323 मतदान केंद्रांवर गुरुवार, दि.5 फेब्रुवारीला मतदान तर शनिवार, दि.7 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.
या निवडणुकांसाठी 15 निवडणूक निर्णय अधिकारी व 15 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यात एकूण 59 जिल्हा परिषद गट व 118 पंचायत समिती गणांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आहे.
पनवेल गट संख्या 8 गट व गण संख्या 16, कर्जत गट संख्या 6 गट व गण संख्या 12, खालापूर गट संख्या 4 गट व गण संख्या 8, सुधागड गट संख्या 2 गट व गण संख्या 4, पेण गट संख्या 5 गट व गण संख्या 10, उरण गट संख्या 4 गट व गण संख्या 8, अलिबाग गट संख्या 7 गट व गण संख्या 14, मुरुड गट संख्या 2 गट व गण संख्या 4, रोहा गट संख्या 4 गट व गण संख्या 8, तळा गट संख्या 2 गट व गण संख्या 4, माणगाव गट संख्या 4गट व गण संख्या 8, म्हसळा गट संख्या 2 गट व गण संख्या 4, श्रीवर्धन गट संख्या 2 गट व गण संख्या 4, महाड गट संख्या 5 गट व गण संख्या 10, पोलादपूर गट संख्या 2 गट व गण संख्या 4 असे एकूण59 जिल्हा परिषद गट व 118 पंचायत समिती गण आहेत.
मतदान केंद्रे
पनवेल मतदान केंद्र संख्या 346, कर्जत मतदान केंद्र संख्या 220, खालापूर मतदान केंद्र संख्या 144, सुधागड मतदान केंद्र संख्या 75, पेण मतदान केंद्र संख्या 190, उरण मतदान केंद्र संख्या 135, अलिबाग मतदान केंद्र संख्या 261, मुरुड मतदान केंद्र संख्या 81, रोहा मतदान केंद्र संख्या 194, तळा मतदान केंद्र संख्या 52, माणगाव मतदान केंद्र संख्या 206, म्हसळा मतदान केंद्र संख्या 69, श्रीवर्धन मतदान केंद्र संख्या 80, महाड मतदान केंद्र संख्या 203, पोलादपूर मतदान केंद्र संख्या 67 असे जिल्ह्यात एकूण 2 हजार 323 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.
मतदार संख्या
पनवेल-पुरुष मतदार 1 लाख 43 हजार 724, स्त्री मतदार 1 लाख 36 हजार 32, इतर 20 असे एकूण 2 लाख 79 हजार 776, कर्जत-पुरुष मतदार 84 हजार 777, स्त्री मतदार 85 हजार 925 असे एकूण 1 लाख 70 हजार 702, खालापूर-पुरुष मतदार 55 हजार 676, स्त्री मतदार 55 हजार 303, इतर 3 असे एकूण 1 लाख 10 हजार 982, सुधागड-पुरुष मतदार 27 हजार 111, स्त्री मतदार 26 हजार 787 असे एकूण 53 हजार 998, पेण-पुरुष मतदार 69 हजार 581, स्त्री मतदार 69 हजार 898 असे एकूण 1 लाख 39 हजार 479, उरण-पुरुष मतदार 52 हजार 773, स्त्री मतदार, इतर 2 असे एकूण 1 लाख 8 हजार 520, अलिबाग-पुरुष मतदार 98 हजार 806, स्त्री मतदार 1 लाख 3 हजार 117 असे एकूण 2 लाख 1 हजार 923, मुरुड-पुरुष मतदार 27 हजार 224, स्त्री मतदार 28 हजार 328 असे एकूण 55 हजार 552, रोहा-पुरुष मतदार 64 हजार 946, स्त्री मतदार 63 हजार 817 असे एकूण 1 लाख 28 हजार 763,
तळा-पुरुष मतदार 15 हजार 895, स्त्री मतदार 16 हजार 227 असे एकूण 32 हजार 122, माणगाव-पुरुष मतदार 69 हजार 95, स्त्री मतदार 70 हजार 424 असे एकूण 1 लाख 39 हजार 519, म्हसळा-पुरुष मतदार 20 हजार 827, स्त्री मतदार 22 हजार 704 असे एकूण 43 हजार 531, श्रीवर्धन-पुरुष मतदार 27 हजार 142, स्त्री मतदार 29 हजार 684 असे एकूण 56 हजार 826,, महाड-पुरुष मतदार 69 हजार 185, स्त्री मतदार 70 हजार 261 असे एकूण 1 लाख 39 हजार 446,, पोलादपूर- पुरुष मतदार 19 हजार 485, स्त्री मतदार 19 हजार 757 असे एकूण 39 हजार 242,, असे जिल्ह्यात एकूण पुरुष मतदार 8 लाख 46 हजार 347, स्त्री मतदार 8 लाख 54 हजार 09, इतर 25 असे एकूण 17 लाख 381 मतदार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
मतदार यादी ग्राह्य धरण्याचा दिनांक : 01 जुलै 2025, निवडणूक सूचना प्रसिद्ध : 16 जानेवारी 2026, नामनिर्देशन दाखल व स्विकारणे : 16 जानेवारी ते 21 जानेवारी 2026 (रविवार वगळून, वेळ 11 ते 3), नामनिर्देशन छाननी : 22 जानेवारी 2026 (सकाळी 11 वाजता), वैध नामनिर्देशित उमेदवार यादी प्रसिद्ध करणे : 22 जानेवारी 2026, उमेदवारी मागे घेणे : 23 जानेवारी, 24 जानेवारी व 27 जानेवारी 2026, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे व निशाणी वाटप : 27 जानेवारी 2026 (दुपारी 3.30 नंतर), मतदान दिनांक 05 फेब्रुवारी 2026 (सकाळी 7.30 ते सायं. 5.30), मतमोजणी : 07 फेब्रुवारी 2026 (सकाळी 10 पासून), निवडून आलेल्या उमेदवारांची नावे शासन राजपत्रात जाहीर करणे : 10 फेब्रुवारी 2026 पर्यंत.
आचारसंहिता लागू
निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहणार आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या 4 नोव्हेंबर 2025 च्या आदेशानुसार मंत्री, आमदार किंवा अन्य पदाधिकाऱ्यांना मतदारांवर प्रभाव टाकतील असे कोणतेही धोरणात्मक निर्णय, घोषणा किंवा कृती करता येणार नाही.
जात वैधता प्रमाणपत्र
राखीव प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. परंतु जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, जात वैधता समितीकडे प्रस्ताव केलेल्या अर्जाची सत्यप्रत किंवा असा अर्ज केला असल्याचा कोणताही पुरावा नामनिर्देशन पत्रासोबत सादर करण्याची उमेदवारास मुभा असेल.
नामनिर्देशनपत्रे पारंपरिक ऑफलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील. प्रत्येक मतदारास 2 मते देण्याचा अधिकार राहील पहिले मतद जिल्हा परिषद सदस्यासाठी व दुसरे पंचायत समिती सदस्यासाठी. रायगड जिल्ह्यातील एकूण 2 हजार 323 मतदान केंद्र आहेत. सर्व तालुक्यात पिंक मतदान केंद्र व आदर्श मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. सर्व मतदान केंद्रांवर सुस्थितीत खोल्या, शौचालये, पिण्याचे पाणी, रॅम्प आदी सुविधा उपलब्ध असतील.
मतदारांच्या सोयीसाठी मताधिकार मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले असून, त्याद्वारे मतदारांना आपले नाव व मतदान केंद्राची माहिती सहज शोधता येणार आहे. मा.राज्य निवडणूक आयोगाने पुरेशा प्रमाणात ईव्हिएम (बी.यू 5 हजार 952), (सी.यू. 2 हजार 501) ची व्यवस्था करण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक व सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे जिल्हा निवडणूक प्रशासनाने कळविले आहे.
