Home

नेरुळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड; हार्बर रेल्वे ठप्प; प्रवाशांचे हाल


नेरुळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड; हार्बर रेल्वे ठप्प; प्रवाशांचे हाल

मुंबई(वार्ताहर)

हार्बर रेल्वे मार्गावरील नेरूळ स्थानकात सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे लोकलसेवा ठप्प झाली आहे. सीएसएमटी-पनवेल या अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील लोकलसेवा ठप्प आहे. यामुळे कामाला जाण्याच्या वेळेत स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. परिणामी लोक त्रस्त झाले आहेत. 

सध्या नेरुळ स्थानकात लोकल थांबून आहेत. तर पनवेलहून अप मार्गाकडे निघालेल्या बेलापूर आणि सीवूड्स स्थानकातही अनेक गाड्या थांबवण्यात आल्यात, यामुळे प्रवाशांचा पुरता खोळंबा झाला आहे. ऐन कामाच्या वेळी लोकसेवा ठप्प झाल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन करण्यात आले आहे. वाशी-पनवेल, वाशी-ठाणे मार्गावरील सेवा प्रभावित झाली असून सीएसएमटीकडे जाणाऱ्या हार्बर लोकल ट्रेनमध्ये विलंबाने धावत आहेत. काही ट्रेन वाशी स्थानकातच थांबवण्यात आल्या आहेत. 

 

Previous Post Next Post