दहावीचा निकाल आज जाहीर होणार
पुणे
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज म १३ मे रोजी जाहीर होणार आहे. १३ मे रोजी सकाळी ११ वाजता बोर्डाचे अध्यक्ष निकाल जाहीर करतील. नंतर १ वाजता अधिकृत संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना हा निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच दहावीचा निकाल जाहीर करण्याची शक्यता वर्तवली जात होती. बारावीचा निकाल लागल्यानंतर 10 दिवसांच्या आत निकाल लागेल, असे सांगण्यात आले होते. त्यामुळं विद्यार्थी निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर आज 10 वीचा निकाल लागणार आहे. दरम्यान, यंदा राज्यातून 16 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते. राज्यातील 23 हजार 492 माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली होती. निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून त्यांचे गुण ऑनलाइन पाहता येतील. विद्यार्थ्यांना खाली दिलेल्या सर्व साईटवर जाऊन निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडाळाच्या बारावीच्या निकालानंतर दहावीचे विद्यार्थी आपल्या निकालाच्या प्रतिक्षेत होते. अनेक अंदाज आणि संभाव्य तारखाही समोर येत होत्या. बोर्डाकडूनही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. मात्र, आता बोर्डाने अधिकृतपणे दहावीच्या निकालाबाबत घोषणा केली आहे. दहावीचा निकाल आज १३ मे रोजी जाहीर होणार असल्याची माहिती समोर आली आहे. सकाळी ११ वाजता मंडळाचे अध्यक्ष पत्रकार परिषदेत निकालाची औपचारिक घोषणा करतील. त्यानंतर दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांसाठी अत्यंत निर्णायक असणार असून त्यानंतर पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू होईल.