Home

सारळ येथील सुधीर कडवे यांचे दुःखद निधन


 सारळ येथील सुधीर कडवे यांचे दुःखद निधन 


अलिबाग (रत्नाकर पाटील)

 मिळखतखार- सारळ येथील  सुधीर नारायण कडवे यांचे  दिनांक २५मे रोजीअल्पशा आजाराने  दुःखद निधन झाले.मृत्यू समयी त्यांचे वय ४४ इतके होते.

          सुधीर कडवे हे व्यावसायिक होते.आई मॉड्युलर किचन आणि फर्निचर चे ते मालक होते. अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवार खुप होता.अलिबाग येथील ग्रीन अलिबाग या सस्थेचे ते क्रियाशील सदस्य होते. कावीळ या आजाराने ते आजारी होते. त्यांच्यावर मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल, केईएम रुग्णालयात उपचार  चालू असतानाच त्याचे निधन झाले. त्याच्या पार्थिवावर सारळ समुद्रकिनारी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर व मित्र परिवार,नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहिणी असा परिवर आहे. त्यांचे उत्तरकार्य ५ जून रोजी राहत्या घरी सारळ येथे होणार आहेत.

Previous Post Next Post