Home

चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळलं; 5 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु



चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळलं; 5 जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरु

देहराडून(प्रतिनिधी)

चारधाम यात्रेदरम्यान आज गुरुवारी उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. गंगोत्रीजवळ सात आसनी हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. पोलीस आणि प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. सध्या पथकाकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरचंही मोठं नुकसान झालं आहे.

पोलीस, लष्कर दल, आपत्ती व्यवस्थापन QRT, टीम १०८ रुग्णवाहिका वाहनं घटनास्थळी पोहोचली आहेत. तहसीलदार भटवाडी, बीडीओ भटवाडी व महसूलचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहेत. गंगाणीच्या पुढे असलेल्या नाग मंदिराखाली भागीरथी नदीजवळ हे हेलिकॉप्टर कोसळल्याची माहिती आहे. अपघात ग्रस्त हेलिकॉप्टर खासगी कंपनी एरो ट्रिंकचे होते आणि त्यात सात जण बसलेले होते. या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर दोन प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात कसा झाला, याबाबत सध्या काहीही माहिती नाही.

 

Previous Post Next Post