Home

वांद्र्यामध्ये अग्नितांडव; शोरूमला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी


 

वांद्र्यामध्ये अग्नितांडव; शोरूमला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी

मुंबई(वार्ताहर)

मुंबईतील वांद्रे येथे भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. वांद्र्यातील क्रोमा शोरूममध्ये मंगळवारी पहाटे भीषण आग लागली. वांद्र्याच्या लिंकिंग रोडवर हे शोरूम आहे. आग इतकी भीषण आहे की आगीमध्ये शोरूमचे मोठे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे शर्थिचे प्रयत्न सुरू आहेत.

बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, वांद्र्याच्या लिंकिंग रोडवरील तीन मजली बिझनेस पार्क असलेल्या लिंक स्क्वेअर मॉलच्या तळमजल्यावर असेलल्या क्रोमा शोरूममध्ये ही आग लागली. पहाटे ४.१० वाजता ही आग लागली. अग्निशमन दलाला ४.११ वाजता पहिला कॉल आला. आगीची माहिती मिळताच ४.१७ वाजता अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या आगीमध्ये अद्याप कोणतिही जीवितहानी अथवा कोणी जखमी झालेले नसल्याची माहिती समोर आली आहे. वांद्रे पश्चिमेकडील लिंकिंग रोडवरील लिंक स्क्वेअर मॉलमध्ये ही आग लागल्याचे कळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली आहे. 

काही नागरिकांनी शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये असे दिसून आले आहे की, शोरूमचा वरचा भाग आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे आणि शोरूममधून आगीच्या मोठमोठ्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट बाहेर पडत आहेत. लिंक स्क्वेअर मॉलमध्ये आग लागल्यानंतर अग्निमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीमध्ये मॉलचे मोठे नुकसान झाले. या आगीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने परिसरात गोंधळ उडाला आहे. मॉल परिसरात वाहतूक कोंडी झाली असून वाहतूक पोलिसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. घटनास्थळावर अग्निशमन दल, मुंबई पोलिस, अदानी इलेक्ट्रिसिटी, पीडब्ल्यूडी आणि स्थानिक वॉर्डचे कर्मचारी आहेत.

Previous Post Next Post