Home

१४ वर्षांच्या वैभव सुर्यवंशीने केली गुजरात टायटन्सची धुलाई; अवघ्या ३५ चेंडूत ठोकले शतक; वैभवच्या वादळात गुजरातचा पालापाचोळा; राजस्थानचा 'राँयल' विजय


१४ वर्षांच्या वैभव सुर्यवंशीने केली गुजरात टायटन्सची धुलाई; अवघ्या ३५ चेंडूत ठोकले शतक; वैभवच्या वादळात गुजरातचा पालापाचोळा; राजस्थानचा 'राँयल' विजय

जयपूर(प्रतिनिधी)

 जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज वैभव सूर्यवंशी या १४ वर्षाच्या मुलाने इतिहास रचला. त्याने ३५ चेंडूंमध्ये १०० धावा केल्या. या सामन्यामध्ये वैभवने अनेक विक्रम मोडले आहेत. वैभवच्या दमदार शतकामुळे राजस्थानचा शानदार विजय झाला आहे. या विजयामुळे राजस्थाची प्लेऑफमध्ये जाण्याची आशा टिकून राहिली आहे.

गुजरात टायटन्सने दिलेल्या 210 धावांचा पाठलाग करताना राजस्थानची सुरूवात जोरदार झाली. वैभव सुर्यवंशी आणि यशस्वी जैसवाल हे गुजरातच्या गोलंदाजांवर तुटून पडले. वैभवने अवघ्या 19 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. पन्नास धावा करताना त्याने सहा सिक्स ठोकले. 8 ओव्हर्समध्येच या दोघांनी शतकी सलामी देत राजस्थानची स्थिती मजबूत केली होती. दहा ओव्हर मध्ये 144 धावांचा टप्पा या दोघांनी गाठला. 14 वर्षाच्या वैभव सुर्यवंशीने 35 चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. 101  धावा करून तो बाद झाला.त्याने 11 षटकारांचा पाऊस पाडला. तर सात चौकारही त्याने लगावले. त्यामुळे 16 ओव्हर्समध्येच राजस्थाने 212 धावा केल्या वैभवला यशस्वी जैसवालची साथ मिळाली. त्याने 40 चेंडूत 70 धावा केल्या. आठ विकेटने राजस्थानने गुजरातवर विजय मिळवला. रियान परागनेही 15 चेंडूत 32 धावा केल्या.

Previous Post Next Post