Home

कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला लागली आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल



कुर्ल्यातील फिनिक्स मॉलला लागली आग; अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल


मुंबई(वार्ताहर )

मुंबईतून एक मोठी बातमी समोर आली आहे. कुर्ला परिसरातील फिनिक्स मॉलला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अचानक मॉलमध्ये आग लागल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मॉलमधील ग्राहकांना तातडीने बाहेर काढण्यात आलं आहे. पण ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला येथील फिनिक्स मॉलमध्ये रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. मॉलमध्ये फूड कोर्टमध्ये ही आग लागली. अचानक आग लागल्यामुळे एकच गोंधळ उडाला. संपूर्ण मॉलमध्ये धूरच धूर पसरला होता. त्यामुळे मॉलमधील सर्व नागरिकांना बाहेर काढण्यात येत आहे. आग लागण्यामुळे मॉलमध्ये एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच  घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ही आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप कळू शकलं नाही. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मॉलमधील सर्व लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं आहे.


Previous Post Next Post