Home

साहित्यिक ज्ञानगंगा व ज्ञानतेज पुरस्कार प्रश्न मंजूषा स्पर्धेचा निकाल जाहीर

 साहित्यिक ज्ञानगंगा व ज्ञानतेज पुरस्कार प्रश्न मंजूषा स्पर्धेचा निकाल जाहीर


उरण (प्रतिनिधी)

   गेली वर्षभर ऑनलाईन मधुबन व्हाट्सअप समूहावर आणि कोमसाप राज्यस्तरीय समूहावर साहित्यिक ज्ञानगंगा व ज्ञानतेज पुरस्कारासाठी साहित्यिक घडामोडींवर प्रश्न मंजूषात्मक स्पर्धा सुरू होती. दर महिन्याच्या दुस-या व चौथ्या शनिवारी ऑनलाईन होणा-या या स्पर्धेत राज्यातील 100 कवी लेखकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे आयोजन कोमसाप जन संपर्क अधिकारी  रायगड भूषण प्रा.एल. बी पाटील सर यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली  उरण कोमसाप शाखेने  आयोजीत केले होते.

 या स्पर्धेचे प्रमुख परीक्षण करणारे आयोजक व नियोजक कोमसाप उरण शाखेचे अध्यक्ष श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी उरण कोमसापच्या अधिकृत व्हाट्सअप समूहावर निकाल जाहीर केला तो पुढील प्रमाणे.

    

साहित्यीक ज्ञानगंगा पुरस्कार विजेते

1] श्री.प्रविण शांताराम पनवेल 

     अनुक्रमांक  29

    384 पैकी 354.5 गुण

2) सौ.संजना जुवाटकर  -कळवा ठाणे

 अनुक्रमांक 4

384 पैकी 343 गुण 


3) श्री.मोरेश्वर बागडे- ठाणे

अनुक्रमांक  - 05 

384 पैकी 332 गुण


4) सौ.रोहिणी कोठावदे डोंबिवली

अनुक्रमांक  -38

384 पैकी 323.5 गुण 


5)वैभवी माने अय्यर- उल्हासनगर 

अनुक्रमांक  99

384 पैकी 319.5 गुण 


साहित्यिक ज्ञानतेज पुरस्कार विजेते


1)सौ.वनिता शिंदे - पुणे

अनुक्रमांक 68

384 पैकी 319 गुण


2)सौ.कविता झुंजारराव दहिसर 

अनुक्रमांक 12

384 पैकी 316.5 गुण 


3)श्री.पी.जी.ठाकूर पनवेल

 अनुक्रमांक  - 59

384 पैकी 316.5 गुण 


4) सौ.जान्हवी भोईर  नेरूळ

अनुक्रमांक  57

384 पैकी 313 गुण 


5) प्राची कर्वे पुणे

अनुक्रमांक 81

384 पैकी 310.5 गुण 


विजेत्यांना विविध मान्यवरांच्या हस्ता दि.4/5/2025 रोजी रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे

अशी माहिती श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी दिली.

  सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी 

श्री.रामचंद्र म्हात्रे (अध्यक्ष मधुबन कट्टा)  सौ.रंजना केणी  (कार्याध्यक्ष  कोमसाप उरण),श्री.संजय होळकर  -(जिल्हा प्रतिनिधी) श्री.अजय शिवकर  (सचिव कोमसाप उरण) 

श्री.संजीव पाटील  (बालविभाग प्रमुख कोमसाप शाखा उरण )

श्रीम. समता ठाकूर  (महिला प्रतिनिधी)  आणि कोमसाप उरण शाखेचे  कार्यरत सदस्य

श्री.भरत पाटील, श्री.किशोर पाटील 

श्री.हेमंत पाटील, श्री. रमण पंडीत 

श्री.अनिल भोईर, श्री.न.ग.पाटील

आदींनी विशेष मेहनत घेतली

Previous Post Next Post