राज्यस्तरीय कवी संमेलनात कवीवर्य दिनेश खैरे यांचा सन्मान.
अलिबाग (वार्ताहर)
वसुधा फाउंडेशन पुणे व राज युवा प्रकाशन, पुणे .आयोजित माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलन व 'आईचे हळवे मन' लघुकथा पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्ताने आयोजित माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलनात नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील कार्यरत कर्मचारी ,साहित्यिक ,कवी श्री दिनेश ताराचंद खैरे. यांनी आपली स्वरचित कविता 'आई' या कवितेचे सादरीकरण केले. याबद्दल त्यांना सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
माय मराठी राज्यस्तरीय कवी संमेलन व मा. सौ.वसुधाताई नाईक लिखित 'आईचे हळवे मन' या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्ययन केंद्र सावरकर भवन पुणे. येथे नुकते संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या स्वागताअध्यक्षा सौ. वसुधाताई नाईक(वसुधा फाउंडेशन संस्थापिका), कार्यक्रम अध्यक्ष मा. डॉ. मधुसूदन घाणेकर (पहिले विश्व काव्य संमेलन अध्यक्ष), कवी संमेलन अध्यक्ष सौ विमलताई माळी (आधुनिक बहिणाबाई) विशेष उपस्थिती मा.श्री गिरीश जंगमे (सुप्रसिद्ध युवा गझलकार), मा. जयप्रकाश भालचंद्र झेंडे (ज्येष्ठ साहित्यिक), मा. श्री. वि. ग. सातपुते (ज्येष्ठ साहित्यिक) आदी मान्यवर उपस्थित होते. या राज्यस्तरीय कवी संमेलनात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील 70 कवी कवयित्रींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
कवी श्री दिनेश ताराचंद खैरे हे मीतभाषी, मृदु स्वभावाचे, सेवा कार्यतत्पर, कवी लोक साहित्यिक म्हणून प्रसिद्धआहेत. शैक्षणिक ,अध्यात्मिक, सांस्कृतिक, अशा क्षेत्रात त्यांचा वावर आहे. त्यांची दोन पुस्तके सुद्धा प्रकाशित झालेली आहेत. गेली 25 वर्षे ते विविध मासिके, वृत्तपत्रे, प्राथमिक कवितासंग्रह, दिवाळी अंक आदींमध्ये लेखन करत आहेत त्यांना अनेक राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार प्राप्त झालेआहेत.
श्री दिनेश खैरे यांना मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त मा.प्रा. श्री सचिन सानप (सर), नौरोसजी वाडिया महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्री वसंत चाबुकस्वार (सर), प्रबंधक, श्री राजेंद्र तागडे (सर), डॉ. श्री लक्ष्मण चौधरी (सर), डॉ. प्रकाश चौधरी सर, डॉ. श्री अशोक उबाळे (सर), सहसंचालक ,(उच्च शिक्षण) विभाग पुणे. डॉ. अर्चना बोऱ्हाडे ( मॅडम) प्रशासन अधिकारी, (उच्च शिक्षण) विभाग पुणे, श्री अरविंद भागवत सर, श्री माणिक मुंढे सर, श्री बाळासाहेब पोटे सर. श्री विनायक चव्हाण सर, श्री विजय सावरतकर सर, माजी गटशिक्षणाधिकारी मा. श्री ए. बी. पाटील सर, श्री सुरेश पाटील सर, प्रा. सौ संजीवनी पाटील (मॅडम), श्री नामदेव गवळी सर, श्री राजाराम साधले सर, श्री देवदास जामदार गुरुजी, श्री शिवाजीराव हराळे (मास्तर), श्री सतीश गोगावले सर, श्री राम यादव सर, आदींचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. मधुकर्णीका सारिका सासवडे यांनी केले.
