देव मनाच्या गाभाऱ्यात
देव मनाच्या गाभाऱ्यात
जपावी खरी माणुसकी
भुकेल्या गरजवंतांविषयी
अंतरी ठेवावी आपुलकी..
देव मनाच्या गाभाऱ्यात
वाहू द्या निर्मळ प्रेम झरा
सुस्वभावाची सुगंधी दरवळ
हाच यशाचा मूलमंत्र खरा..
तुझं माझं करण्यातच नको
दवडू अनमोल जीवन मानवा
त्याग परोपकारी वृत्ती ठेवून
मिळेल आपसूक सर्वत्र वाहवा
उजळव मनातील कोपरा न कोपरा
स्वार्थापलीकडचा डोंगर ओलांडून
आत्मिक समाधान मिळेल खरे
प्रेम आपुलकीचे नातं जपून ..
आयुष्याच्या रणांगणात टिपावे
आनंदाचे अनमोल सुखद क्षण
दुसऱ्यांच्या वदनी हास्य पेरून
फुलवावा जीवनाचा कण कण..
सौ.सुजाता सोनवणे.
सिलवासा दा.न.ह.
