स्त्रीची गाथा
समस्त महिलांना समर्पित केलेला खास दिवस म्हणजे आठ मार्च जागतिक महिला दिवस.स्त्रीच्या ज्या काही जबाबदाऱ्या आहेत जसे समाजाप्रती, देशाप्रती, कुटुंबाप्रती या सर्व जबाबदाऱ्या आणि कर्तव्य मोठ्या मनाने ती सांभाळते स्विकारते म्हणून त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जात असावा.जागतिक महिला दिनाचे पडसाद आपल्या दरवर्षी भारताच्या सार्वजनिक जीवनातील प्रसारमाध्यमांतून ऐकायला, बघायला मिळत आहेत. आजही आपल्या देशात पुरूषप्रधान संस्कृती आहे.आणि ती प्रत्येक घराघरांत आपल्या दिसून येते.त्यात आता बदल होणे आज काळाची गरज आहे.
सर्व क्षेत्रात स्त्रिया कार्यक्षम असल्याचं चित्र जिकडेतिकडे आहे.अनेक पदावर स्त्रिया आहेत. सर्व जगात स्त्रिया फिरतांना दिसत आहेत. स्त्री ही सर्वगुणसंपन्न आहे. प्रत्येक स्त्री कलागुणांनी नटलेली आहे. तरी पण स्त्रीला पुरूषांच्या बरोबरीने समान स्थान अजूनही मिळालेल नाही. स्त्री पुरूष हे मानवी समाजाचे अविभाज्य असे घटक आहेत.एकमेकांच्या हातात हात घालून जेव्हा हे वाटचाल करतील तेव्हाच दोघांचाही,विकास होणे शक्य आहे. तेव्हा हा विचार पुन्हा पुन्हा समाजाने करण्याची आणि आचरणात आणण्याची नितांत आवश्यकता आहे.
आजही बहुसंख्य स्त्रीयांमध्ये आरक्षणाच्या नावाखाली तीच्यावर काही दिशादर्शक बिरूदे लादल्या गेली आहेत. सतत पुरूषांच्या संदर्भात पुरूषांच्याच विचारात जगतांना ती दिसते आहे.अनेक ठिकाणी तीच्यावर शंकेचे ताशेरे उडविले जात आहेत.तीचा कधी कुटुंबात तर कधी समाजात अनादर होताना काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसते आहे.ती आपल्या अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई लढताना दिसतेय. बहुतेक ठिकाणी स्त्रियांचं शोषण केल्या जाते तर भर चौकात आजही तीच्यावर बलात्कार होतांना उघड्या डोळ्यांनी बघीतल्या जाते. तीला आजही दुय्यम स्थान दिल्या जात आहे. या सर्व अत्याचाराला ती बळी पडते आहे.तरीही तीला चार भीतींआडचं जगणे जगावं लागत आहे. हे आता कुठेतरी बंद होणे तेवढेच गरजेच आहे.म्हणून या सर्व स्त्रीवरील दुय्यमांचे निर्बंध नष्ट करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोडबिलाच्या माध्यमातून स्त्रीला स्वातंत्र्य मिळण्याची संहिता,कायदा निर्माण केला. पण त्याचा अजूनही पुरेपूर वापर होताना दिसत नाही.
आजच्या समाजचौकटीत प्रामुख्याने आपल्या पाहायला मिळते की बऱ्याच प्रमाणात स्त्रीयाच स्त्रीच्या कामात मदत करतात.जर स्त्री घरकाम करणारी असेल तर घरातलं रांधणं वाढणं याव्यतिरिक्त अनेक कामे रितसर आटोपून मुलांची देखभाल ती चांगल्या पध्दतीने करते.त्यांच्यावर योग्य ते संस्कार देण्यासाठी जीवाची बाजी लावते.जर स्त्री नौकरी करणारी असेल तर,मुलांना सांभाळण्यासाठी सासु,आई,किंवा पाळणाघरातील बाई बाळाची काळजी घेत असते.यावेळी पुरूषानेसुध्दा अपत्यसंगोपनाची भुमिका का स्विकारू नये असा गौण प्रश्न कित्येकदा समोर ऊभा असतो. अपत्य जन्माला आल्यानंतर स्तनपाना व्यक्तीरिक्त त्याला सांभाळण्याची जबाबदारी आई वडील ही दोघांचीही असावी.अशावेळी पुरूषाने आपला पुरूषी रुबाब बाजूला ठेवून पत्नीच्या प्रत्येक कामात समान हक्काने हातभार लावले तर ते वावगं ठरणार नाही.समाजातील प्रत्येक स्त्रीचे स्थान पुरूषाप्रमानेच तीच्या कर्तृत्वावर ठरावे.ते तीच्या शिक्षणावर,सौंदर्यावर,किंवा पतीच्या समाजातील स्थानावर ठरू नये.प्रत्येक घरातील वारसाहक्कावर तीचा वाटा असावा. समतेचा आदर्श ,आदर प्रत्येक स्त्रीला मिळावा. तीने आर्थिक, मानसिक सर्व बाजूने स्वावलंबी होण्यास,तीच्या कार्याची दखल घेण्यास समाजातीला प्रत्येक घटकाने विचार करावं चिंतन करावं.कारण पुरूषांच्या बरोबरीने सार्वजनिक आयुष्य स्त्रीयांना सुध्दा जगता यायला पाहिजे. समाजाची जर प्रगती बघायची असेल तर,पुरूषांच्या खाद्याला खाद्या लावून स्त्रीने लढले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने महिला दिन साजरा होईल..
संगीता बोरकर-बांबोळे
9405718463
