पसायदान' दिवाळी अंकास अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उत्तेजनार्थ पुरस्कार
कल्याण (वार्ताहर)
कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला..याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमात सन २०२४ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकाच्या स्पर्धेत राजसा प्रकाशन तर्फे प्रकाशित झालेल्या ''पसायदान" दिवाळी अंकास अक्षरमंच सामाजिक सांस्कृतिक प्रतिष्ठानचा उत्तेजनार्थ पुरस्कार जाहीर झाला होता. सदर पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक १ मार्च २०२५ रोजी झालेल्या प्रकाशन सोहळ्यात सदर कार्यक्रमाची अध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ सर (उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ आणि केंद्रीय कार्याध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद) यांच्या शुभ हस्ते स्वीकारताना संपादक - प्रा. नागेश हुलवळे, प्रकाशक - राजेश साबळे, ओतूरकर, साई हुलवळे आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर मा. सुधीर शेठ, मा. माधव जोशी, मा. डॉ सुनील खर्डीकर, मा. सुनील बडगुजर आयोजक मा. योगेश जोशी, सौ. सुकन्या जोशी..
