सण पाडव्याचा आला
सण पाडव्याचा आला
उभारू गुढी सौख्याची
करुया नवीन सुरुवात
प्रेमळ मानवी नात्याची
कडुलिंब पाने चघळतांना
अर्क काढून प्यावा थोडा
झेंडू फुलला गर्द केशरी
दारावरती तोरणे सोडा
प्रगतीच्या पथावरून
सुसाट माणसाचा वारू
सौहार्दाच्या स्वागतार्थ
गुढी आनंदाची उभारू
मांगल्याचे प्रतीक कापड
तांब्या गुढीवर रचलेला
गंध, फुले ,लाल अक्षता
पूजनास आरंभ केला
नात्यांना बळकटी देण्यास
एक गुढी उभारली मनात
सौख्याची गुढी उंचावताना
सुखक्षण आले जीवनात
सचिन पाटील
(अलिबाग, रायगड)
.jpg)