इंटिग्रेट ग्लोबल युनिव्हर्सिटी दिल्ली तर्फे दर्शन म्हात्रे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान
अलिबाग(प्रतिनिधी)
अलिबाग तालुक्यातील सामाजिक क्षेत्रात अतिशय अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व म्हणून दर्शन म्हात्रे यांच्याकडे पाहिले जाते. गोरगरीब तसेच गरजूंना मदत करण्याची तरुणांना शैक्षणिक तसेच नोकरी विषयक मार्गदर्शन करून प्रत्यक्षात निस्वार्थपणे नोकरी मिळवून देण्यासाठी विशेष योगदान आहे. आदिवासी तसेच इतर समाजातील मुलांना शैक्षणिक मार्गदर्शन करून त्यांना सुद्धा रोजगार देण्याचे काम केले आहे. क्रीडा क्षेत्रातील अनेक तरुणांना नोकरी देऊन क्रीडा क्षेत्रात देखील यशस्वीपणे यांचे फार मोठे योगदान आहे. प्रीमियम कंपनीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून कार्यरत असताना स्थानिक मुलांना नोकरी मिळवून देण्यात नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत. प्रशासकीय कामकाजाचा दांडगा अनुभव तसेच सर्वांसोबत हितगुज राखणारे व्यक्ती म्हणून महाराष्ट्रात त्यांना ओळखले जाते. दर्शन म्हात्रे यांना समाजकार्य या विषयातून मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन तसेच कौतुक होत आहे.
