कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वाघोडे अंतिम विजेता
अलिबाग(सचिन पाटील)
अलिबाग तालुक्यातील वाघोडे येथे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने शिव सागरगड पंचक्रोशी संघटना व गुरूकृपा क्रिडा मंडळ वाघोडे तर्फे स्व. कै. रामा राघो पाटील स्मृती चषक कबड्डी स्पर्धेत जय हनुमान वाघोडे संघ अंतिम विजेता ठरला, द्वितीय क्रमांक ओम साई आपटी, तृतीय क्रमांक जय हनुमान नागझरी, चतुर्थ क्रमांक जय हनुमान वडवली यांनी मिळवीले. विजेत्या संघाना रोख रकमेसह चषक देण्यात आले.
सर्वोत्कृष्ट खेळाडू : पार्थ संदीप (आपटी), सहाय्यक पक्कड : निखिल म्हात्रे (आपटी) उत्कृष्ट चढाई : प्रणव इंदुलकर (वाघोडे) सहाय्यक चढाई : प्रथमेश इंदुलकर ( वाघोडे ) उत्कृष्ट पक्कड : सागर जाधव (नागझरी),पब्लीक हिरो : हार्दिक चव्हाण (वडवली), नवोदीत खेळाडू : भूषण पाटील ( गुरुकृपा वाघोडे ) याना विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले या स्पर्धेचे समालोचन निलेश पाटील(श्रीगाव) यांनी केले ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गुरूकृपा क्रिडा मंडळ वाघोडेच्या सर्व सभासदांनी अथक परिश्रम घेतले
