Home

साहित्यिक गोकुळ गायकवाड यांना रमाई साहित्यभूषण पुरस्कार


 साहित्यिक गोकुळ गायकवाड यांना रमाई साहित्यभूषण पुरस्कार


 अहिल्यानगर(वार्ताहर)

      शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी माता रमाई यांच्या १२७ व्या जयंतीच्या निमित्ताने श्रावस्ती बुद्ध विहार नान्नज ता. जामखेड जि. अहिल्यानगर येथील उपासक, उपासिका व सर्व  समाज बांधवांच्या वतीने  गेली ३५ वर्षांपासून बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे बौद्धाचार्य आदर्श शिक्षक साहित्यिक गोकुळ श्रीरंग गायकवाड जामखेड जि अहिल्यानगर यांना धम्म आणि साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'रमाई साहित्यभूषण पुरस्कार'  २०२५  मेजर चंद्रकांत साळवे, आर पी आय तालुका अध्यक्ष सतीश नाना साळवे , बौध्दाचार्य सचिन सोनवणे,  संदेश घायतडक, सुभाष साळवे, नागराज सोनवणे, केशव दादा साळवे,दासा साळवे कुणाल साळवे, पियुश पोळ, शुभम साळवे, दीपक साळवे, संदीप कुडलीक सोनवणे, सह समाज बांधव आणि महिला उपासिका  या सर्वांनी मिळून साहित्य गोकुळ गायकवाड यांचा  सन्मानपूर्वक  फेटा बांधून शाल बुके आणि सुंदर आकर्षक असे सन्मानचिन्ह देऊन गौरव केला.

     गोकुळ गायकवाड यांच्या  विविध साहित्य कृतीला दोन वर्षांत  आता पर्यंत २२ साहित्य पुरस्कार प्राप्त झाले आहेत....याचाच सार्थ अभिमान म्हणून  श्रावस्ती बुद्ध विहार नान्नज ता जामखेड येथील समाज बांधवांनी आज  गोकुळ गायकवाड यांचा यथोचित सन्मान केला. आणि त्यांच्या पुढील धम्म आणि साहित्य  कार्यास शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post