कवयित्री, लेखिका व उज्वल व्यसनमुक्ती उपचार व पुनर्वसन केंद्राच्या संचालिका उषा घोडेस्वार यांचा शब्दगंध काव्यसंग्रह प्रकाशित
भंडारा(प्रतिनिधी)
प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा यांच्या वतीने विदर्भ स्तरीय लोककला महोत्सवाचे आयोजन ग्राम पिंडकेपार येथे करण्यात आले. या महोत्सवात वेगवेगळे कलापथक सादर करण्यात आले, तसेच विदर्भ स्तरीय कवी संमेलन मोठ्या थाटात पार पडले, या संमेलन प्रसंगी अध्यक्ष श्री कविवर्य सुभाष मानवटकर यांच्या अध्यक्षतेखाली कवयित्री मा. उषा घोडेस्वार यांच्या "शब्धगंध" काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
याप्रसंगी प्रबोधनकार कला साहित्य संघ भंडारा चे अध्यक्ष मा. भावेश कोटांगले, केंद्रीय संयोजक मा. मनोज कोटांगले, कवी नाशिकभाऊ चवरे, कवी कार्तिक तिरपुडे, कवी प्रल्हाद मेश्राम, कवी सुभाष धकाते, कवयित्री संगीता ठलाल, कवी राहुल तागडे, कवी प्रयाग बोरकर, कवी शिवकुमार बनसोड, जेष्ठ कवयित्री सुशीलाबाई लांजेवार व संघाचे सर्व प्रतिनिधी तसेच गावकरी उपस्थित होते.
सर्वांच्या सहकार्याने हा पुस्तक प्रकाशन कार्यक्रम अतिशय उत्कृष्ठ रित्या हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
