Home

रोहा कोलाड रेल्वे स्टेशन दरम्यान तरुण झाला तुतारीमधून पडून गंभीर जखमी कामोठे एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू



 

रोहा कोलाड रेल्वे स्टेशन दरम्यान तरुण झाला तुतारीमधून पडून गंभीर जखमी कामोठे एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू 

रायगड - अमुलकुमार जैन 

  मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी तुतारी एक्स्प्रेसने जाणाऱ्या देवगड सिंधुदुर्ग येथील चो🥰वीस वर्षीय तरुण ओमकार राउत हा रेल्वेतून पडुन गंभीर जखमी झाला आहे. सदर घटना ही रोहा कोलाड रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या बाहे गावानजीक घडली आहे. 

   तुतारी एक्स्प्रेस गाडी नंबर 11033 ही 2 जानेवारी 2025 रोजी 00.05 वाजता दादर रेल्वे स्थानक येथून रवाना झाली होती.ही रेल्वे तीनच्या सुमारास मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने धावणारी तुतारी एक्स्प्रेस या रेल्वेतून पडुन अपघात झाला असल्याची महिती जकुमी ओमकार राउत यांच्या सोबत असणाऱ्या मित्र मंडळींनी माणगाव रेल्वे पोलिस दलाला दिली आहे.

सदर घटनेची माहिती मिळताच रोहा पोलिस ठाण्याचे कर्मचारी आणि बाहे गावचे पोलिस पाटील व एस व्ही आर एस एस या बचाव पथकाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाहिले असता ओमकार राउत हा गंभीर जखमी अवस्थेत होता.

ओमकार राउत याला तातडीने प्राथमिक उपचार मिळावे यासाठी रोहा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तदनंतर अधिक उपचारासाठी कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती रोहा पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Previous Post Next Post