Home

साखरपा टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत एस. के. बी. भडकंबा संघाने पटकावले विजेतेपद


 
साखरपा टेनिस प्रीमियर लीग स्पर्धेत एस. के. बी. भडकंबा संघाने पटकावले विजेतेपद

माजी सभापती जया माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने चॅलेंजर साखरपा व जुगाई सेवा मंडळ भंडारवाडी यांच्यावतीने आयोजन 

साखरपा(वार्ताहर)

 संगमेश्वर तालुका माजी सभापती जया माने यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या साखरपा टेनिस प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा एस. के. बी भडकंबा हा संघ विजेता ठरला. तर जय भवानी बाईतवाडी भडकंबा हा संघ उपविजेता ठरला.मागील 4 वर्षापासून स्थानिक खेळाडूंना वाव मिळावा या हेतूने ही स्पर्धा खेळविण्यात येते. दरवर्षी या स्पर्धेची यशाची उंची वाढत आहे. 
यंदाच्या सिझनमध्ये भडकंबा वॉरियर्स, जय भवानी बाईतवाडी भडकंबा, दिपलक्ष्मी ट्रॅव्हल्स, सतीमाता जाधववाडी, चॅलेंजर भंडारवाडी, बाळूमामा ट्रॅव्हल्स हे संघ सहभागी झाले होते. ही स्पर्धा 21 जानेवारीपासून लीग पद्धतीने खेळविण्यात आली. बुधवारी या स्पर्धेचा अंतिम दिवस पार पडला. विजेत्या एस. के. बी भडकंबा संघाला 30,000 रोख व आकर्षक चषक देण्यात आला.उपविजेत्या जय भवानी बाईतवाडी संघाला रोख रक्कम 20,000 व आकर्षक चषक देण्यात आला.
या स्पर्धेत सर्वोत्तम खेळाडू व फलंदाज निखिल चव्हाण ठरला, त्याला एलईडी टीव्ही व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. सर्वोत्तम गोलंदाज सागर हातीसकर, निखिल साळुंखे सर्वोत्तम नवोदित खेळाडू, अमोल कांगणे याला षटकार किंग म्हणून गौरविण्यात आले. मागील 3 वर्षे भडकंबा हा संघ विजेतेपदापासून हुलकवणी देत होती. यंदा मात्र या संघाच्या विजेतेपदाने पाठीराखा्यांनी जोरदार जल्लोष केला. यावेळी माजी सभापती जया माने यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर उपस्थित होते. 
यावेळी राजेश पत्याने, बापू शेट्ये, मनोहर सुकम, दत्ता घुमे, अजय सावंत, बापू शिंदे, संजय सुर्वे, शेखर आकटे, मंगेश दळवी, प्रवीण जोयशी, अमोल लाड, बापू लोटणकर, कृष्णा सकपाळ, विनायक गोवरे, संतोष कांबळे, ओंकार सुर्वे, प्रथमेश सुर्वे, केतन दुधाने, संतोष पांगळे, रवी सावंत, मयु सावंत, उदय काळोखे, कमलेश मावळणकर, उदय बाईत, सुरेश कटम, सचिन अंकुशराव, विलास कांगणे, दीपक गोवरे, जनक जागुष्टे, मंदार आठल्ये, राजू जाधव, प्रदीप ढवळ, राजा वाघधरे, दत्ता वाघधरे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुमित वाघधरे, मारुती वाघमारे, महेश मयेकर, सुमित वाघधरे यांनी मेहनत घेतली.

Previous Post Next Post