Home

अयोध्येचा राजा..... कवी सचिन पाटील


 


अयोध्येचा राजा 



अयोध्येचा राजा| सुकुमार राम||

जीवाचा विश्राम||प्रभू माझा||1||


कौसल्या नंदन| आदर्श नरेश||

 जणू भाग्यरेष|उजळावी||2||


अयोध्येचा राजा ||प्रभू रामचंद्र|

पौर्णिमेचा चंद्र|शोभे नभी||3||


सितापती योग्य| रामराजा थोर||

अंतरीचा घोर|मिटवितो||4||


सचिन म्हणतो|दशरथ पुत्र||

दुनियेचे सूत्र|हाती घेतो||5||


सचिन पाटील

(अलिबाग, रायगड)

Previous Post Next Post