नवी मुंबई महानगरपालिकेला पदपथ दुरुस्तीसाठी मनसे नेरुळ विभाग सचिव अक्षय कदम यांचे निवेदन
नवीमुंबई-नेरुळ प्रतिनिधी (जान्हवी भोईर )
नवीमुंबई प्रभागातील नेरुळ सें-०८ मधील अरुणोदय सोसायटी समोरिल पदपथावर झालेल्या दुरवस्थामुळे तेथून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना, लहान मुलांना कित्येकदा छोट्या मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले होते... त्याच संदर्भात येथील स्थानिक नागरिकांनी सदर पदपथाची दुरुस्ती करण्यात यावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेरुळ विभाग सचिव कु. अक्षय कदम यांना निवेदन दिले असता त्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मा.कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका यांना निवेदन देण्यात आले आहे...
सदर निवेदनावर प्रतिसाद देताना केलेल्या मागणीनुसार मा.कार्यकारी अभियंता यांनी लवकरात लवकर त्या पदपथावरील जुने पेव्हरब्लॉक काढून त्याठिकाणी आधुनिक पद्धतीने काँक्रीटीकरण करून सदर पदपथाची डागडुजी करून देऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी योग्य ती कार्यवाही करून स्थानिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आली आहे -कु.अक्षय कदम विभाग सचिव, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नेरुळ नवी मुंबई.
