कोर्लई येथे झालेल्या निष्पाप अल्पवयीन मुलीवर शाररीक अत्याचार करणाऱ्या तातडीने कारवाई करण्याची मागणी
अलिबाग - अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात बावीस वर्षीय नराधम याच्याकडून सात वर्षीय मुलीवर शाररिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार झाल्याचेही उघड झालंय. नराधमांनीच चिमुकल्या मुलींवर अत्याचार केल्याचे समोर आल्यानंतर कोर्लई गावासहित जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा नराधम आर्यन दिपक कोटकर याच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अशी मागणी कोर्लई ग्रामस्थ यांनी निवेदन द्वारे रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरर्विले यांच्याकडे देण्यात आले.
मुरुड तालुक्यातील कोर्लई या गावात दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटाच्या सुमारास सात वर्षीय पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी आर्यन पाटील याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञान असण्याचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत घेवून जावून तेथे तिच्या गुप्तांगात हाताची बोटे घालून त्या जागेवर गंभीर दुखापती करून तिच्यावर शारीरीक अत्याचार केला आहे.
याबाबत पिडीत मुलींच्या आईने अल्पवयीन मुंलीस विश्वासात घेतले व त्यानंतर अल्पवयीन पिडीत मुलींने घडलेला प्रकार कथन केला त्यानंतर याबाबतची तक्रार अल्पवयीत पिडीत मुलींच्या चाळीस वर्षीय आईने रेवदंडा पोलिस ठाणे येथे नोंदविली असून रेवदंडा पोलिस ठाणे येथे पिडीताच्या पालकांनी नोंदविलेल्या तक्रारीनुसार आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय रेवदंडा पोलिसांनी आरोपी आर्यन दिपक कोटकर यांला त्याच्या घरात असलेल्या माळ्यावरून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर झालेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव व गावातील लोक असुरक्षित झाले आहेत. या गुन्हेगारावर अगोदर मौजे कोर्लई येथे महिलांची छेडछाड, चोरी, मारामाऱ्या, व अन्य गुन्हे दाखल आहेत.
कोर्लई येथे अल्पवयीन मुलींवर लैगिक शारिरिक अत्याचार घडल्याची घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. कोर्लई ग्रामपंचायत सरपंच राजश्री मिसाळ यांनी दि. 29 डिसेंबर रोजी सायकांली पाच वाजता ग्रामपंचायत कार्यालयात विशेष ग्रामसभेेचे आयोजन केले. यावेळी कोर्लई ग्रामस्थ व कोर्लई मधील विविध राजकीय पक्षीय मंडळी यांनी सुध्दा उपस्थिती ठेवली. ग्रामसभेत कोर्लई सरपंच राजश्री मिसाळ यांनी कोर्लई मध्ये घडलेल्या या घटनेचा निषेध व्यक्त केला. यावेळी भगिरथ पाटील, प्रशांत भोय, आदी सर्वच विविध पक्षातील नेते मंडळीनी सुध्दा सरपंच राजश्री मिसाळ यांना पांठीबा दर्शवीत निषेध व्यक्त करून या घटनेतील आरोपीस जास्तीत जास्त व कठोर शिक्षा व्हावी यासाठी रेवदंडा पोलिस ठाणे येथे निवेदन देण्याचा ठराव घेण्यात आला.
सदर गुन्हेगाराच्या सोबत कोर्लई गावातील फारूक नाझीम बेबल व विरेन्द्र रोहिदास चोरढेकर व यश घारगे (थेरोंडा) हे इसम सातत्याने सोबत असतात सदरचे गुन्हेगार रात्रीच्या वेळी समुद्रकिनारी गांजा चरस अशा गोष्टींचे सेवन करून रात्री अपरात्री गावामध्ये फिरत असतात. या गोष्टीमुळे गावात दहशत निर्माण करण्याचा घाट घातला आहे.
तरी सर्व घटनांचा विचार करता या आरोपींना चौकशी करून गावातून हद्दपार करावे. अशी ग्रामसभेमध्ये मागणी केलेली आहे. तरी याबाबत तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रेवदंडा पोलिस ठाणे येथे कोर्लई ग्रा.प.सरपंच राजश्री मिसाळ, भगिरथ पाटील, प्रशांत भोय,अनंत पाटील, जितेंद्र पाटील, उपेंद्र बलकवडे, अभय पाटील, गजानन पाटील, रियाज चौगले, पठाण, कोर्लई पोलिस पाटील आदी कोर्लई ग्रामस्थ यांनी सपोनि श्रीकांत किरविले यांची भेट घेवून निवेदन दिले.
रायगड जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मानसी दळवी यांनी कोर्लई येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारबाबत रेवदंडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत किरविले यांची भेट घेत झालेल्या प्रकरणबाबत सखोल माहिती घेतली. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराबाबत सखोल चौकशी करून आरोपी आर्यन कोटकर यास कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे जेणकरून यापुढे कोणीही गुन्हेगार यांनी मुलीची अथवा महिलेची छेड काढताना शंभर वेळा विचार केला पाहिजे यासाठी कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे असे मानसी दळवी यांनी म्हंटले आहे.
