साळाव येथील जे एस डब्ल्यू वसाहतमध्ये पाच बंद घरे फोडली- पाच लाखाहून अधिक ऐवज चोरीस
रायगड - अमुलकुमार जैन
मागील काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जे एस डब्ल्यू वसाहतमध्ये पाच बंद घरे फोडून दोन लाख रोख रक्कमेसह तीन लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची बाब उघडकीस आली आहे.
रायगड जिल्ह्यातील साळाव येथील जे एस डब्ल्यू वसाहतमध्ये बंद असलेली पाच घरे फोडून अज्ञात चोरट्याने पाच लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज लंपास केला असल्याची फिर्याद राजेंद्र वासुदेव रोटकर (वय-५३ वर्षे, व्यवसाय - नोकरी, सध्या रा. डी,०५ रूम ६४, जे.एस.डब्ल्यु रेसीडेशियल कॉलनी बिर्ला मंदिर जवळ साळाव ता. मुरूड जि. रायगड) यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुरुड तालुक्यातील साळाव ग्राम पंचायत हद्दीतील मौजे जे एस डब्ल्यू वसाहतमध्ये दिनांक २८/१२/२०२४ ते २९/१२/२०२४ दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी राजेंद्र रोटकर घराचे दरवाज्याचे लॉक तोडून १,२०,०००/- रू एक सोन्याचे धातुचे गंथण वजन अंदाजे ४ तोळे वजनाचे,९०,०००/- रू तीन सोन्याचे धातुचे हार प्रत्येकी १ तोळा वजनाचे,७५,०००/- रू दोन सोन्याच्या धातुचे हातातील बांगड्या वजन अंदाजे प्रत्येकी सव्वा तोळा प्रमाणे अडीच तोळे वजनाचे,३०.०००/- रू दोन सोन्याच्या धातुचे कानातील कुडया वजन अंदाजे प्रत्येकी अर्धा तोळा प्रमाणे एक तोळे वजनाचे,१२.०००/- रू दोन सोन्याच्या धातुचे गळ्यातील ठुषी हार अंदाजे ४ ग्रॅम वजनाचा,१५००/- रू दोन सोन्याच्या धातुच्या लहान मुलीच्या कानातील कुडया अंदाजे ०.५ ग्रॅम वजनाचा,२,००,०००/- रू ५०० रू दराच्या भारतीय चलनातील ४००नोटा असा एकूण पाच लाख अठ्ठावीस हजार पाचशे रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला आहे तसेच जे एस डब्ल्यू वसाहतमध्ये असणारे पाटेकर, चव्हाण, नयन पॉल, ई.सी. सोनिया यांचे देखील दरवाजाचे लॉक तोडुन चोरी केली आहे.पाटेकर, चव्हाण, नयन पॉल, ई.सी. सोनिया यांचे रूम बंद असल्याने अजून काही चोरीस गेले आहे याची माहिती प्राप्त झाली नाही.
रेवदंडा पोलिस ठाण्यात गुन्हा रजि.नं.व कलम-कॉ.गु.रजि.नं.१७३/२०२४भारतीय न्यायसंहीता कलम २०२३ चे कलम प्रमाणे३३१(३),३३१(४), ३०५ (अ), प्रमाणे दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक शिवकुमार नांदगावे करीत आहेत.
