कळंबोली येथे पोलिसांच्या घरात पडला दरोडा : रोख रक्कम सहित सोळा लाख ९५हजार रूपयाचा ऐवज लंपास
पोलिसांची घरे सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य व्यक्तीची घरे कशी सुरक्षित राहणार
रायगड - अमुलकुमार जैन
रायगड जिल्ह्यातील कळंबोली येथे जनतेचे रक्षक असणारे पोलिस दलातील कर्मचारी याच्या घरीच अज्ञात चोरट्याने दरोडा टाकत पंचेचाळीस हजार रुपये रोख रक्कम सहित सोळा लाख ९५हजार रूपयाचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.
रायगड जिल्ह्यात चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस घरे सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
चोर आणि पोलीस यांच्यात नेहमी लपाछपी खेळ सुरु असते. परंतु चोरटे कधी पोलिसांच्या घरात चोरी करण्याची हिंमत करत नाही. रायगड जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी यांच्या घरातील पाच लाखाची रोकड चोरीस गेल्याची घटना ताजी असतानाच नवी मुंबईतील या चोरट्यांनी कळंबोली येथे पोलिसांच्या घरातच डल्ला मारला. या चोरट्यांनी पोलीस कर्मचऱ्यांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू सोबत देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केली. यामुळे पोलीस कर्मचारी याच्यावरच कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची वेळ आली आहे.
याबाबत कळंबोली पोलीस ठाण्यात अमोल परशुराम म्हात्रे, (वय ४१ वर्ष, धंदा नोकरी, रा. एलआयजी ०२, रूम नं.डी ४५, सेक्टर २ ई, कळंबोली, ता. पनवेल, जि. रायगड) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
अमोल परशुराम म्हात्रे हे सेक्टर दोन ई कळंबोली येथे राहत असून त्यांच्या भावाच्या मुलीचा वाढदिवस असल्याने सर्व लोक पेण, सोनखार येथे दहा डिसेंबर रोजी गेले होते. ११ डिसेंबर रोजी पहाटे सहाच्या सुमारास त्यांच्या रूमच्या वर राहणाऱ्या भाडेकरू यांनी तुमच्या घराचा दरवाजाचा लॉक तुटलेला दिसत असल्याचे सांगितले.
सदर घरफोडी ही दिनांक १०/१२/२०२४ रोजी रात्री ०८:०० ते दिनांक ११/१२/२०२४ रोजी पहाटे ०५:४५ वाजताच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने केली असून या घरफोडी मध्ये५,००,०००/- रूपये किंमतीचे प्रत्येकी ५ तोळयाची दोन सोन्याची बीस्कीट, ५०,००००/- १ तोळयाच्या कानातील सोन्याच्या रिंगा ,५०,०००/- १ तोळयाच्या दोन आंगठ्या ,१,००,०००/- २ तोळयाची गळयातील चैन, ५,००,०००/- १० तोळयाचे मंगळसुत्र, २,००,०००/- ४ तोळयाच्या दोन बांगडया, २,५०,०००/- ५ तोळयाची गळयातील चैन, ४५,०००/- रकमेच्या भारतीय चलनी नोटा असा एकूण१६,९५,०००/-रूपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.
याबाबत कळंबोली पोलीस ठाणे येथे ४८१/२०२४, बी. एन. एस. ३३१ (४) ३०५ प्रमाणे भादवी कलम ४५७ ३८० नुसार दाखल करण्यात आला आहे
राज्यात गुन्हे वाढत चालले आहे. गुंडांच्या टोळ्याही वाढल्या आहेत. भुरटे चोरटे ठिकाठिकाणी चोऱ्या करत असतात. परंतु एखाद्या पोलीस कॉलनीत जाऊन हातसफाई करणारे चोरटे हिंदी चित्रपटातच दिसले. मात्र, आता मुंबई पोलिसांना या चोरट्यांनी नाकीनऊ आणले आहे. चोरट्यांनी रात्रपाळीवर असलेले पोलीस कर्मचारी, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केले. या घरांमधील वस्तू चोरऱ्या. तसेच काही वर्षा पूर्वी माहीम येथील पोलीस कॉलनीच्या शेजारील वसाहतीतील प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयांमध्ये देखील चोरांनी चोरी केली. आता माहीम पोलीस त्या चोरांचा शोध घेत आहे.तर रायगड जिल्ह्यातील रेवदंडा येथे रेवदंडा पोलिस ठाण्यात महीला पोलिस कर्मचारी आरती एकनाथ पाटील यानी ज्या पेटीत रक्कम ठेवली होते त्या पेटीत खाली ठेवलेला डब्यातील एकूण 5,00,000/- रुपये रक्कम नसल्याचे लक्षात आल्यानंतर आरती पाटील यांनी रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.
