सरकारचे खातेवाटप अखेर जाहीर; देवेंद्र फडणवीसांकडे गृहखाते, अजित पवारांकडे अर्थखाते तर एकनाथ शिंदेंकडे नगरविकास खाते राहणार
मुंबई(प्रतिनिधी)
खातेवाटपाशिवाय विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन पार पडलं. दरम्यान हिवाळी अधिवेशन संपताच महायुतीने खातेवाटप जाहीर केलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपद आपल्याकडे ठेवलं आहे. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे नगरविकास आणि गृहनिर्माण खातं देण्यात आलं आहे.
फडणवीस सरकारने घेतली. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारही झाला. पण मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप झालं नव्हतं. नागपूरचं हिवाळी अधिवेशनही खातेवाटपाशिवायच झालं. मात्र अखेरच्या दिवशी खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे.
कोणाला कोणतं खातं?
1) देवेंद्र फडणवीस - गृह, ऊर्जा, कायदा आणि न्यायव्यवस्था
2) एकनाथ शिंदे - नगरविकास, गृहनिर्माण
3) अजित पवार - अर्थ, राज्य उत्पादन
4) चंद्रशेखर बावनकुळे - महसूल
5) राधाकृष्ण विखे- पाटील - जलसंपदा (गोदावरी आणि कृष्णा खोरे)
6) हसन मुश्रीफ - वैद्यकीय शिक्षण
7) चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्रशिक्षण आणि संसदीय कार्यमंत्री
8) गिरीश महाजन - जलसंपदा (विदर्भ, तापी आणि कोकण)
9) गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा आणि स्वच्छता
10) गणेश नाईक - वनमंत्री
11) दादा भुसे - शालेय शिक्षण
12) संजय राठोड - जलसंधारण
13) धनंजय मुंडे - अन्न व नागरी पुरवठा
14) मंगलप्रभात लोढा - कौशल्य विकास
15) उदय सामंत - उद्योग आणि मराठी भाषा
16) जयकुमार रावल - मार्केटिंग आणि प्रोटोकॉल
17) पंकजा मुंडे - पर्यावरण आणि हवामान बदल, पशुपालन
18) आदिती तटकरे- महिला व बालविकास
19) अतुल सावे - ओबीसी, डेअरी विकास आणि अक्षय ऊर्जा
20) भरतशेठ गोगावले-रोजगार हमी
21) शिवेंद्रराजे भोसले- सार्वजनिक बांधकाम
22) माणिकराव कोकाटे- कृषी
23) बाबासाहेब पाटील- सहकार