Home

लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; खासगी बस ताम्हिणी घाटात उलटली; ५ जणांचा मृत्यू; २५ जण जखमी



लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाचा घाला; खासगी बस ताम्हिणी घाटात उलटली; ५ जणांचा मृत्यू; २५ जण जखमी

माणगाव(वार्ताहर)

लग्नाला निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला आहे. पुणे-दिघी महामार्गावर रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात कोंडेथर गावच्या हद्दीत बस उलटून भीषण अपघात झाला. आज शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असून २५ जण जखमी झाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव येथून जाधव कुटुंब हे महाड येथील बिरवाडी येथे बसमधऊन लग्नसमारंभासाठी खासगी बसने जात होते. खाजगी बस ही जात असताना ताम्हिणी घाटात वॉटरफॉल पॉईंटजवळ धोकादायक वळणावर बस ड्रायव्हरचे नियंत्रण सुटले आणि बसचा भीषण अपघात झाला. ही गाडी पूर्णपणे पलटी झाली आणि पाच जणांचा मृत्यू झाला.

या अपघाताची माहिती मिळताच माणगाव पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी त्यांच्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली. बचावकार्य तातडीने सुरू करण्यात आले असून पोलीस, रेस्क्यू टीम, आणि वैद्यकीय मदत घटनास्थळी दाखल झाली आहे. जखमींवर माणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांकडून या अपघाताप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

Previous Post Next Post