शिवसेना भगवा सप्ताह निमीत्त सदस्य नोंदणीच्या फॉर्मचे वाटप.
अलिबाग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात भगवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानुसार, संपूर्ण महाराष्ट्रात ४ ते ११ ऑगस्ट २०२४ या दरम्यान हा सप्ताह साजरा होणार आहे.
भगव्या सप्ताहच्या निमीत्ताने चौल नाका येथे शिवसेना सदस्य नोंदणी राबविणे, बुथ प्रमुख, गट प्रमुख व बी.एल.ए. यांच्या नेमणुका करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे अश्या कामांसाठी चौल नाका येथे नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, विभाग प्रमुख मारुती भगत, माजी ग्रामपंचायत सरपंच सौ.रुपाली म्हात्रे, उपसरपंच अजित गुरव, उपविभाग प्रमुख शैलेश घरत, शहर प्रमुख रोहित पाटील, शाखा प्रमुख राजेंद्र गुरव, अजित मिसाळ, महिला उपतालुका संघटिका सौ.लीना घरत, मा. ग्रां. सदस्य अतुल वर्तक व शिवसैनीक उपस्थित होते.
