श्री.सुधाकर चव्हाण यांच्या मला जगायचंय आहे या दोन अंकी नाटकाला उत्कृष्ट नाटक पुरस्कार
अलिबाग (प्रतिनिधी)
तितिक्षा इंटरनॅशनल पुणे या अग्रगण्य संस्थने कोल्हापूर येथे शनिवार दिनांक ६जून २०२६ रोजी तितिक्षा कला साहित्य संमेलन भरवले होते.या संमेलनात
आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार विविध साहित्यकृतींना देण्यात आलेत . त्यात खोपोलीतील ज्येष्ठ साहित्यिक श्री.सुधाकर चव्हाण यांच्या *मला जगायचं आहे* या दोन अंकी नाटकाला उत्कृष्ट नाटक आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले याप्रसंगी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होते कोळीगीत सम्राट राजेश खर्डे वेसावकर आणि ऍड. शंकर अंदाणी याच्या हस्ते श्री सुधाकर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले
श्री सुधाकर चव्हाण यांचे मला जगायचे आहे या दोन अंकी नाटकाला श्री रवींद्र घोडके सर यांनी प्रस्तावना दिली असून सदर पुस्तक हे शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे.शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. परंतु आत्महत्या हा त्यावर उपाय नाही असा जिवंत प्रश्न या नाटकात मांडण्यात आलेला आहे. सदर नाटक हे उत्कृष्ट नाटक असल्याचे आयोजक तसेच संस्थापक अध्यक्षा सुप्रिया दामले यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
,श्री.सुधाकर चव्हाण यांचे या आधी वधु वर -सुचक डॉट कॉम, ज्वालामुखी स्वातंत्र्याचा, त्याग हे नाटक प्रकाशित झाले आहेत तसेच मृगजळ कादंबरी, एक रात्र रक्ताळलेली हा कथासंग्रह, अस्वस्थ मन हा काव्यसंग्रह अशा प्रकारची पुस्तकं सरांची प्रकाशित झालेली आहेत. त्याचप्रमाणे याआधी मृगजळ या कादंबरी देखील मराठी साहित्य मंडळ ठाणे या संस्थेकडून उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळालेला आहे अशा प्रकारे ज्येष्ठ साहित्यिक ही सुधाकर चव्हाण यांच्या तितीक्षा इंटरनॅशनल संस्था पुणे यांनी दोन अंकी नाटक *"मला जगायचं आहे* या नाटकाला उत्कृष्ट नाटक आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार देऊन सन्मानित केल्याबद्दल श्री चव्हाण यांचे अनेक थरातून अभिनंदन होत आहे त्याचप्रमाणे श्री चव्हाण यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा त्यांच्याकडून असेच अधिकाधिक उत्कृष्ट साहित्य निर्मिती व्हावे ही सदिच्छा