कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघातून भव्य दिव्य वर्षा सहलीसाठी तब्बल २४ बसेस रवाना.
कुसुंबळे,श्रीगाव(विशेष प्रतिनिधी)
शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी व रसिकाताई केणी यांच्या वतीने प्रथमच महिलांसाठी वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले आहे. कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघातील माता भगिनींसाठी शनिवार दिनांक १० ऑगस्ट २०२४ व रविवार दिनांक ११ ऑगस्ट २०२४ रोजी महड, रांजणगाव, आई एकविरा, शनिशिंगणापूर, शिर्डी अशा पाच तीर्थक्षेत्रांचे आयोजन केले आहे. सदरील या वर्षासहलीसाठी तब्बल २४ सुस्थितीतील ट्रॅव्हल बसेसचे आयोजन जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांनी केले आहे. आत्तापर्यंतच्या कारकीर्दीत कोणीच इतक्या मोठ्या प्रमाणात माता भगिनींसाठी वर्षासहलीचे आयोजन केले नव्हते परंतु जिल्हाप्रमुख राजाभाई तसेच रसिकाताई केणी यांच्या प्रयत्नातून प्रथमच अशा मोठ्या स्वरूपात नियोजन करून वर्षा सहल काढण्यात आली आहे. यावेळी कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघातील कुर्डूस, हेमनगर, कुसुंबळे, कातळपाडा, पिटकिरी, काचळी, वाघविरा, नवीन वाघविरा, देहेन, शहाबाज, श्रीगाव, ताडवागळे, पेझारी, सांबरी गावांतील जवळ जवळ १२६५ महिला व १६८ लहान मुले मुली या वर्षा सहलीसाठी आज सकाळी रवाना झाली आहेत त्यामुळे सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. या वर्षा सहलीच्या आयोजनासाठी विशेष आयोजन समिती नेमण्यात आली असून प्रत्येक बसमध्ये स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत. तसेच सर्वासाठी भोजन,पाणी, राहण्याची व्यवस्था केली असून अतिशय नियोजनबद्धरित्या वर्षा सहलीचे आयोजन करण्यात आले असल्याने कोणतीही गैरसोय होणार नसल्याची माहिती यावेळी जिल्हाप्रमुख राजाभाई केणी तसेच रसिकाताई केणी यांनी यावेळी दिली आहे.
