Home

कोकण मराठी साहित्य परिषद वर्षा सहल संपन्न


 

कोकण मराठी साहित्य परिषद वर्षा सहल संपन्न..

शाखा-रोहा,मुरुड,तळा,माणगावचा संयुक्त उपक्रम...

संजय गुंजाळ यांचा षष्ठप्दीपुर्तीसोहळा  उत्साहात...

महाकवी कालिदास दिन संपन्न...


अलिबाग(प्रतिनिधी)कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा-मुरुड-तळा व माणगाव यांचे संयुक्त विद्यमाने निवी,रोहा येथील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या बयोज फार्म या ठिकाणी वर्षा सहलीनिमित्त पंचवीस वर्ष नगरसेवकपद भुषवलेले संजय गुंजाळ यांचा षष्ठप्दीपुर्ती सोहळा व महाकवी कालिदास दिन अतिशय उत्साहात संपन्न झाला.सदर कार्यक्रमास कोमसाप जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ,जिल्हा समन्वयक अ.वि.जंगम,केंद्रीय प्रतिनिधी,पत्रकार गणेश कोळी,दुर्ग अभ्यासक तथा लेखक सुखद राणे,को.म.सा.प.शाखा रोहा अध्यक्षा संध्या दिवकर,माणगाव शाखा अध्यक्ष अजित शेडगे,रोहा शाखा सचिव विजय दिवकर आदि.मान्यवर व्यासपिठावर उपस्थित होते.

            सुरुवातीला पहिल्या सत्रात माजी नगरसेवक,मुरुड शाखाध्यक्ष संजय गुंजाळ यांचे अभिष्टचिंतन कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते दिपप्रज्वलन,महाकवी कालिदास प्रतिमापुजन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचे पुष्प व दैनंदिनी देऊन स्वागत करण्यात आले.प्रास्ताविकात रोहा शाखा अध्यक्षा संध्या दिवकर यांनी कार्यक्रमाचे स्वरुप स्पष्ट केले.संजय गुंजाळ यांचे साठ दिव्यांनी औक्षण व शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शाखा रोहा,माणगाव,गोरेगाव,तळा,उरण,पनवेल,महाड,मुरुड या शाखांकडून यथोचित सत्कार करण्यात आला.जिल्हा युवाशक्तीप्रमुख,गझलकार सिध्देश लखमदे यांनी गुंजाळ सरांवरील स्वरचित कवितेचे उत्तम सादरीकरण केले.यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर शेठ यांनी अध्यक्षीय मनोगतात गुंजाळ सरांच्या कर्तृत्वाचे अनेक पैलू उलगडून दाखवून त्यांना सदिच्छा दिल्या यावेळी  महाड शाखा अध्यक्ष शाहिर गंगाधर साळवी यांनी मनोगत व काव्य सादर केले.सर्वच वक्त्यांनी आपल्या भाषणात गुंजाळ सरांचे कौतूक करुन जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी गुंजाळ सरांनी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करुन आपला जीवनपट मांडताना आपल्या आई-वडिलांचा आवर्जून उल्लेख केला.पत्नी सायली गुंजाळ यांनीही समयोचित मनोगत व्यक्त केले.दुसऱ्या सत्रात आयोजित कविसंमेलनात तीस कवींनी आपल्या वेगवेगळ्या विषयावर कवितेचे सादरीकरण केले.कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी रायगडभुषण सुखद राणे यांनी भुषविले.सर् उपस्थित कवींना गुंजाळ सरांकडून दैनंदिनीचे वाटप करण्यात आले.अभिष्टचिंतन सोहळ्याचे सुत्रसंचालन तळा शाखा अध्यक्ष हेमंत बारटक्के यांनी तर कविसंमेलनाचे निवेदन डॉ.चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोहा शाखा सचिव विजय दिवकर व जिल्हा युवाशक्तीप्रमुख सिध्देश लखमदे व कोमसाप शाखा रोहा टिमने परिश्रम घेतले.


Previous Post Next Post