Home

उज्ज्वल माणुसकी आमदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

 

उज्ज्वल माणुसकी आमदार चषक २०२६ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन 


अलिबाग | प्रतिनिधी

उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “उज्ज्वल माणुसकी आमदार चषक 2026” लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता तलवार ग्राउंड, लोणारे-थळ येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात पार पडले.

या उद्घाटन प्रसंगी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था अध्यक्षा उज्ज्वला चंदनशिव/चव्हाण, माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, उज्ज्वल भविष्य खजिनदार डॉ. नितीन गांधी, बिपिन राऊत, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन सदस्य जयंत नाईक, आरसीएफ कोच अभय घरत, मॉर्निंग क्रिकेट क्लब थळ प्रमुख श्याम नाईक, अभि थेरोंडेकर, रायगड पोलीस कर्मचारी ऋषिकेश साखरकर, समीर हकीम, संदेश गुंजाळ, मुख्य कार्यवाहक संदीप जोशी, अंपायर शैलेश महाडिक, स्कोरर सागर काटकर, सुधाकर निषाद तसेच इतर मान्यवर व उज्ज्वल भविष्य आणि माणुसकी टीम मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धेतील पहिला सामना मॉर्निंग क्रिकेट थळ व लायन्स टीम अलिबाग यांच्यामध्ये रंगला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात मॉर्निंग ग्रुप थळ संघाने 30 धावांनी विजय मिळविला. तर दुसऱ्या सामन्यात वरसोली टीमने नवगाव मॉर्निंग ग्रुपचा दणदणीत पराभव केला.

यावेळी रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सदस्य जयंत नाईक यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना सांगितले की, “प्रत्येक खेळाडूंनी स्वतःचे आरोग्य जपत क्रिकेट खेळणे गरजेचे आहे.”

ही स्पर्धा कौस्तुभ यांच्या माध्यमातून “ड्रीम्स क्रिकेट”च्या युट्युब लाईव्हवर प्रक्षेपित करण्यात येत असून “क्रिकहिरोज” अ‍ॅपद्वारे सर्व क्रिकेटप्रेमींपर्यंत सामन्यांची माहिती पोहोचविण्यात येत आहे. स्पर्धेला क्रिकेटप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Previous Post Next Post