Home

अलिबाग येथे ‘सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास’ वृद्धाश्रमाचे भव्य उद्घाटन

 अलिबाग येथे ‘सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास’ वृद्धाश्रमाचे भव्य उद्घाटन


अलिबाग (प्रतिनिधी )

मु. मानी, पोस्ट-थळ, ता. अलिबाग, जि. रायगड येथे उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या “सहजानंद आध्यात्मिक गोपाळ निवास” या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या निवास सुविधा (वृद्धाश्रम) उपक्रमाचे उद्घाटन दिनांक ३ मे २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाले.

या प्रसंगी मा. आमदार महेंद्र दळवी साहेब व नगरसेवक माननीय प्रशांत नाईक साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.  चनेरा-बिरवाडी (रोहा) येथील माजी सरपंच आत्माराम कासार, देहदान संस्था अध्यक्ष गिरीश तुळूपुळे, राजिप समन्वयक जयवंत गायकवाड, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन सदस्य जयंत नाईक, खंडाळे सरपंच नशिकेत कावजी, परहूर सरपंच प्रफुल पाटील, मानी-भुते सरपंच अस्मिता म्हात्रे तसेच डॉ. राहुल शर्मा, डॉ. अनिल डोंगरे, डॉ. तिवारी व डॉ. साबू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच अलिबागकर ग्रुपचे आमरेश, अश्विन शिंदे, अँटी करप्शन ग्रुप सदस्य, लायन्स क्लब अलिबाग व मांडवा, अँटी करप्शन ऑफ इंडिया, कलाविश्व फाउंडेशन, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, सुरभी स्वयंसेवी संस्था, परहूर, खंडाळे व मानी-भुते ग्रामपंचायत सदस्य, आरसीएफ HR डॉ. राकेश कवळे, देहदान संस्था सदस्य, बालाजी मंदिर ट्रस्ट सदस्य, रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन सदस्य व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उज्ज्वला मॅडम यांच्या सासूबाई मनीषा दामोदर चव्हाण तसेच श्री. संदेश दामोदर चव्हाण व त्यांच्या संपूर्ण परिवरांने कार्यक्रमास उपस्थित राहून मनःपूर्वक शुभआशीर्वाद दिले.

या वेळी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून संस्थेच्या या उपक्रमाचे कौतुक करत, समाजातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानपूर्वक, सुरक्षित व आपुलकीचे निवासस्थान उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद केले. या उपक्रमामुळे समाजात सेवाभावाची जाणीव अधिक दृढ होऊन अशा कार्यांना चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व मान्यवर व उपस्थितांचे संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले.

Previous Post Next Post