Home

शिवसेना वाढतेय..सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद-राजा केणी



 

शिवसेना वाढतेय..सदस्य नोंदणीला उत्फुर्त प्रतिसाद- राजाभाई केणी 


अलिबाग (विशेष प्रतिनिधी)

रायगड जिल्ह्यात शिवसेनेकडे(शिंदे गट) तरुणांचा. वाढता कल पाहून भविष्यात शिवसेना संपूर्ण जिल्हा व्यापून टाकेल यात शंका नाही .असा विश्वास सेनेचे रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी व्यक्त केला आहे.

शिवसेना जनसंपर्क कार्यालय हेमनगर अलिबाग रायगड येथे शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी अर्ज भण्यासाठी युवकांनी मोठी गर्दी केली होती.

     शिवसेना( शिंदे गट) सदस्य नोंदणी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत शिवसेना वाढविण्यासाठी  प्रयत्न केला जात आहे. मागील तीन वर्षात महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध विकास योजना राबविल्या आहेत. या योजनांचा सर्व सामान्य जनतेला होत असलेला उपयोग लक्षात घेऊन सामान्य जनता सेनेच्या पाठीशी ठाम पणे उभी आहे. 

    जिल्ह्यात शिवसेना वाढत आहे. अलिबाग मुरुड विधानसभा मतदासंघातील जनता आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर बेहद खूष आहे.त्यामुळे विविध कार्यकर्ते सेनेत जाहीर प्रवेश करीत आहेत.हीच पक्ष वाढीची पहिली नांदी आहे.आता सदस्य नोंदणीला जो काही प्रतिसाद मिळत आहे,यातून तरुणाई मोठ्या संख्येने सेने कडे आकर्षित होत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

    हेमनगर  येथील सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आज सदस्य नोंदणी साठी मोठी गर्दी झाली होती. पक्षाचा एक पदाधिकारी म्हणून मला दिलेली जबाबदारी आमदार महेंद्र दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली 

प्रामाणिकपणे पार पाडत असल्याचे राजा केणी यांनी सांगितले.जिल्ह्यात शिवसेना एक नंबरचा पक्ष ठरेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


Previous Post Next Post