Home

कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघात शेकापक्षाला अखेरची घरघर


 

कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघात शे. का प ला अखेरची घरघर!

कुसुंबळे गावातील शेतकरी कामगार पक्ष संपृष्टात


अलिबाग (विशेष प्रतिनिधी)

 अलिबाग तालुक्यामध्ये लोकसभा निवडणूकीमध्ये अलिबाग मुरुड- रोहा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार महेंद्रशेठ दळवी,  शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख राजा भाई केणी यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार सुनिलजी  तटकरे यांना ३९ हजार मतांची आघाडी दिल्यानंतर तालुक्यात उरला सुरला शेतकरी कामगार पक्ष शेवटची घटका मोजत असतानाच कुर्डूस जिल्हा परिषद मतदार संघातील कुसुंबळे गावातील शेकडो ग्रामस्थांनी आमदार महेद्र शेठ दळवी व जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. 

ध्रुव काशिनाथ ठाकूर, जितेश ध्रुव ठाकूर, हितेश ध्रुव ठाकूर निता ध्रुव ठाकूर, हर्षदा जितेश ठाकूर, जयराम ठाकूर, प्रणय पाटील, भूषण रामचंद्र पाटील, विठ्ठल धर्मा धुमाळ, प्रणित नाईक, प्रज्वल उदय नाईक, रघुनाथ नारायण पाटील बाळाराम नाईक, संतोष नाईक, सखाराम नाईक. निकेश नाईक, अमीर नाईक, दिपक पवार किशोर पवार, सचिन नाईक लक्ष्मण पवार, राम नानू नाईक, बबन नाईक, विठ्ठल पवार,

कुसुंबळे आदीवासीवाडी प्रमुख उपस्थिती पक्षप्रवेश, गटनेत्या मानसीताई दळवी, जिल्हा प्रमुख राजाभाई केणी जीवन पाटील, उत्तमशेठ, मन्मय पाटील, हृदयनाथ पाटील प्रमोद पाटील, अनिकेत पाटील , शैलेश पाटील, प्रतीक पाटील आदी उपस्थित होते



Previous Post Next Post