Home

तुझी माझी मैत्री.... कवयित्री शरयु पाम्पट्टीवार


 


 तुझी माझी मैत्री


तुझी माझी मैत्री

विश्वासाचा धागा

नसतो उगीच

हेवेदावे त्रागा...१


सुदाम्याचे पोहे

मैत्रीसाठी गोड 

प्रेम जिव्हाळ्यास

नसे कुठे तोड...२


सहवास तुझा 

सुगंधी अत्तर 

उधळूया गंध

एकमेकांवर...३


पाठीवर थाप 

देई पाठबळ

नको स्वार्थ मनी

घालू एक गळ ...४


शब्द तुझा देई

जगण्या उभारी

हातामध्ये हात 

संकटा निवारी . ..५


लाभकारी असे 

तुझे रागावणे 

आवडते मज

हक्क गाजवणे...६


तुझी माझी मैत्री 

शीतल चंदन

सुदाम्याचा मित्र 

देवकी नंदन ...७



सौ.शरयु पाम्पट्टीवार.

दिग्रस यवतमाळ.

Previous Post Next Post