ओळखीचे गाव
सिद्ध प्रेमाच्या छायेत
माझ्या ओळखीचे गाव
दिनरात्र वारंवार
मन घेई जिथे धाव ...१
भक्तीमय प्रसन्नता
वाहे जिव्हाळ्याचा झरा
माणुसकी जपताना
वाटे अभिमान खरा...२
इथे रंजल्या गांजल्या
मिळे मदतीचा हात
शाबासकी मिळविता
संकटाची होई मात ...३
नच उच्चनीच भेद
सदा ऐक्याची भावना
आप पर भाव नसे
ध्यानी यशाची कामना...४
प्रेम देऊ प्रेम घेऊ
अंतरात दाटे हर्ष
स्वागतास सज्ज असे
आयुष्याचे नवे वर्ष...५
बंध अतूट नात्याचे
जपतात सारेजण
निर्विवाद मुक्तपणे
जगतात सारे क्षण ...६
सुख शांतीत नांदतो
माझ्या ओळखीचा गाव
अध्यात्मिक क्षेत्रामध्ये
त्याचे अलौकिक नाव...७
सौ.शरयु पाम्पट्टीवार.
दिग्रस, यवतमाळ.
