Home

हृदयस्थ पांडुरंग माझ्या.... कवयित्री प्रिती भालेराव


 हृयस्थ पांडुरंग माझ्या


हृदयस्थ पांडुरंग माझ्या

तू मायेचा आहे सागर,

ध्यानी मनी तूच सख्या

सर्व सुखाचे आगर....१


सृष्टीचा पालनकर्ता 

सर्वांचा सांभाळ कर,

तुझ्या कृपेचे छत्र 

सगळ्यांवर तू धर.....२


जगतनियंता श्रीहरि

तुझे कर कटेवरी,

युगे अठ्ठावीस झाली

कसा उभा विटेवरी....३


व्याकुळेल्या पामरास या

तुझ्या भक्तीची तहान,

वर्णू कशी तुझी महती

आहेस तू रे किती महान....४


तुझ्या भक्तीचा ओलावा

शोभून दिसतो कपाळी,

बुक्क्याचा रंग हा सुंदर

उमटू दे माझ्या भाळी....५


 सौ. प्रिती सुरज भालेराव

(पुणे)

Previous Post Next Post