Home

शिवसेनेचे राजा केणी यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विशेष निमंत्रीत सदस्यपदी निवड


 

शिवसेनेचे राजा केणी यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विशेष  निमंत्रीत सदस्यपदी निवड


प्रामाणिक कार्याची पक्षनेतृत्वाने घेतली दखल


अलिबाग (सचिन पाटील)

 

धीरा पोटी  फळे रसाळ गोमटी...या म्हणीची  प्रचिती शिवसेनेचे रायगड जिल्हा  प्रमुख राजा केणी यांना आली आहे. प्रामाणिक कार्याचे आणि निष्ठावंत म्हणून दिलेल्या योगदानाची दखल ही नेहमी घेतलीच जाते. राजा केणी यांची जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने तसे पत्र नुकतेच जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

    राजा  जगन्नाथ  केणी....यांची गेली 25 ते 30  वर्षाची राजकीय कारकीर्द. या प्रदीर्घ काळात त्यांनी अनेक राजकीय स्थित्यंतर अनुभवली. मधल्या काळात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये त्यांनी प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका ठामपणे बजावली.100 टक्के  योगदान देणे म्हणजे  काय?  याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजा केणी  होय. आपली तत्व  न सोडता ,ज्या दिवशी तात्विक मतभेद निर्माण झाले ,त्या दिवशी त्या पक्षातून बाहेर पडून आपला मार्ग त्यांनी निवडला.

     मूळचा शिवसेनेचा हा शिलेदार . शेवटी राजकीय पिंड ज्या पक्षात तयार झाला त्याच शिवसेनेत  राजा केणी यांनी  आपले पाय भक्कमपणे रोवले. विशेष म्हणजे शेतकरी  कामगार पक्षाचे कट्टर विरोधक,आणि आमदार महेंद्र दळवी यांचे पक्के समर्थक...म्हणून त्यांनी गेल्या काही वर्षात आपली ओळख निर्माण केली. आमदार महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गर्शनाखाली त्यांनी कित्येक लाखाची विकासकामे आपल्या कूर्डस मतदासंघांत राबवली.

   नुकत्याच झालेल्या लोकसभा निवणुकीमध्ये महायुतीचा धर्म पाळताना त्यांच्यातील प्रामाणिक कार्यकर्त्याची साक्ष पटली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या सह महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्या प्रामाणिक कार्याची दखल घेऊन राजा केणी 

यांची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रक सदस्य म्हणून निवड केली आहे. राजा केणी यांनी ,आपल्या या नियुक्ती बद्दल पक्ष श्रेष्ठीचे

विशेष आभार व्यक्त करून , त्यांचा विश्वास सार्थकी लावण्यास कटिबध्द असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.


Previous Post Next Post