Home

सावली...कवयित्री शरयु पाम्पट्टीवार

 


सावली


मायेची  सावली । भासते शीतल |

प्रेमळ कोमल  । माय माझी ॥१॥


ममत्त्वाची मूर्ती । आई शब्द थोर ।

 मिटवितो घोर  । जीवनाचा ॥२॥


अनमोल  देणं । संस्कारांचा ठेवा ।

सुखी ठेव देवा । माऊलीस ॥३॥


जीवनाचे धडे । गिरवून घेते ।

पूर्णत्वास नेते । संकल्पास ॥४॥


कौतुक करूनी । पाठीवर थाप । 

वात्सल्य अमाप। देई बाळां ॥५ ॥


घरात नांदते । तिच्या पायी लक्ष्मी 

समाधान हमी । सान्निध्यात ॥६ ॥


शरयु मानते। जगी महान्माता ।

कुटुंब विधाता । असे आई  ॥७॥


सौ.शरयु पाम्पट्टीवार.

दिग्रस, यवतमाळ.

Previous Post Next Post