Home

हेमनगर येथे प्राथमिक मराठी शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न


 हेमनगर येथे प्राथमिक मराठी शाळेचा लोकार्पण सोहळा संपन्न


गेली ५ वर्षात ५० वर्षापूर्वीची रखडलेली कामे माननीय आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या सहकार्याने  पूर्ण करू शकलो - जिल्हाप्रमुख राजाभाई केणी


अलिबाग प्रतिनिधी, 


अलिबाग मुरुड मतदार संघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या आमदार निधीतून व शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांच्या प्रयत्नातून बांधण्यात आलेल्या रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हेमनगर तसेच अंगणवाडी हेमनगर या नवीन इमारतीचा लोकार्पण सोहळा जिल्हा परिषद गटनेत्या मानसीताई दळवी तसेच शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख राजाभाई  केणी  यांच्या शुभहस्ते अतिशय प्रसन्न वातावरणात संपन्न करण्यात आला. यावेळी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत मिना लोभी, उपसरपंच ग्रुपग्रामपंचायत कुसुंबळे रसिकाताई केणी, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य जागृती पाटील, ज्येष्ठ नागरिक शालिनी पाटील, धनुर्धर पाटील, चंद्रमोहन पाटील, मुरलीधर जोशी अरविंद पाटील(गुरुजी), अंबाजी हरी म्हात्रे (गुरुजी), नागेश ठाकूर, चंद्रकांत पाटील, मुकुंद ठाकूर गोकुळ पाटील, प्रदीप केणी,  माजी सैनिक धनंजय पाटील शाखाप्रमुख हेमगर रामचंद्र म्हात्रे, संगम पाटील, गणेश निळकर, प्रभाकर पाटील बुवा, युवा सेना भुषण पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.पांडुरंग शिवराम पाटील, श्रीधर पाटील, भास्कर पाटील, भरत पाटील, गजानन पाटील, रवींद्र पाटील, एकनाथ जोशी, रामनाथ पाटील, अनंत पाटील, प्रकाश ठाकूर, प्रदीप पाटील, प्रमोद पाटील, किशोर पाटील, दिनेश पाटील, चंद्रकांत पाटील, राजेंद्र पाटील, प्रभाकर पाटील, संजय पाटील, हितेंद्र पाटील, विवेक पाटील, कौशिक पाटील, अशोक पाटील, अनुरथ थळे, दीपक पाटील, अरविंद थळे, हेमंत पाटील, अरुण ठाकूर, तुळसीदास शेळके, विजय वावेकर, सतीश पाटील, शिवाजी पाटील,सुनील पाटील, संतोष ठाकूर, प्रवीण पाटील, संदीप पाटील, संजय पाटील, सुनील ठाकूर, बाळकृष्ण जुईकर, दीपक पाटील गणेश म्हात्रे इत्यादी मान्यवर मंडळी तसेच ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रायगड जिल्हा परिषद गटनेत्या मानसीताई दळवी यांच्या शुभहस्ते यावेळी फीत कापून उद्घाटन करण्यात आले. *गेली पाच वर्षाच्या कारकीर्दीत पन्नास वर्षापूर्वीपासूनची रखडलेली किंवा खो घातलेली कामे पूर्ण होत असताना अतिशय दयनीय स्थितीत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या जागी सुसज्ज अशा इमारती होत आहेत त्यामुळे खऱ्या अर्थाने शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून विकासाची गंगा आली आहे* अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांकडून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत असेल तरच आज आपल्या गावांचा विकास निश्चित होणार आहे *अन्यथा आयुष्यभर सर्वसामान्यांच्या मानेवर सुरू ठेवून सुरी ठेवून स्वतःची पोळी भाजण्याचे काम करणाऱ्यांच्या हातात जर सत्ता दिली तर पुन्हा एकदा भिकेला लावून उपाशी मरण्याची वेळ सर्वसामान्यांवर येईल अशा प्रतिक्रिया उमटत असल्याचे चित्र यावेळी दिसून येत होते. यावेळी स्वतःची सद्विवेक बुद्धी वापरून गेली पाच वर्षाच्या कामांचा आढावा लक्षात घेता योग्य व्यक्तींच्या हातात सत्ता टिकून राहील असे मत यावेळी मानसीताई दळवी यांनी व्यक्त केले.* यावेळी *रायगड जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी आपले मत व्यक्त करताना आम्ही प्रामाणिकपणे जनतेच्या विकासाच्या व कल्याणाच्या दृष्टिकोनातून आवश्यक असणाऱ्या बाबी विचारपूर्वक हाताळून अनेक अडचणींचा सामना करीत विरोधकांच्या विरोधात जाऊन विकासाची कामे आपल्या गावांमध्ये व परिसरातील विविध भागांत  आणली आहेत. केवळ खोटी आश्वासने देऊन सर्वसामान्यांची दिशाभूल करून काहीतरी समज काढून वेळकाढू भूमिका आम्ही घेत नाहीत तर वचन देतो आणि दिलेले वचन पाळतो व दिलेल्या वचनाची वचनपूर्ती करण्याचे कार्य आम्ही शिवसैनिक खऱ्या अर्थाने करीत असतो* त्यामुळे जनता सुज्ञ आहे आणि म्हणूनच योग्य निर्णय घेवून येत्या निवडणुकीत जनतेने विरोधकांना   त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन जिल्हा प्रमुख राजाभाई केणी यांनी जनतेला केले.


Previous Post Next Post