कसा करावा अभ्यास
कसा करावा अभ्यास
घ्यावे समजून नीट
वाटू नये कधी भार
गोडी असावी अवीट...१
प्रातःकाळी उठूनिया
करा योगा प्राणायाम
सकारात्मकता येता
होई बुद्धीचा आयाम...२
एकाग्रता वाढल्यास
मन लागे अभ्यासात
आत्मविश्वासाने मग
शंका सुटे क्षणार्धात...३
घेता सात्त्विक आहार
तंदुरूस्त तन मन
बुद्धी होतसे तल्लख
घडे चिंतन मनन...४
ध्येय असावे निश्चित
जिद्द चिकाटी अंगात
घेता उत्तुंग भरारी
येई भविष्य रंगात...५
नको स्पर्धा स्वतःशीच
कर्म करावे सदैव
शांत संयम कष्टाने
बदलून जाई दैव...६
स्वकर्तृत्वावर नित्य
ठाम असावा विश्र्वास
पूर्णत्वास जाई तेव्हा
मनी निर्धारित ध्यास...७
हूरळून जाऊ नये
येता जय पदरात
असो नम्रता वाणीत
द्वेष लुप्त उदरात...८
पुस्तकाच्या अभ्यासाने
होतो बौद्धिक विकास
मिळालेली अनुभूती
मिळे गती जीवनास...९
जीवनाच्या अभ्यासाचे
घ्यावे जाणूनिया तंत्र
उपयोगी व्हावे ज्ञान
हाच जीवनाचा मंत्र...१०
सौ.शरयु पाम्पट्टीवार.
दिग्रस, यवतमाळ.
