विषय-आला सण होळीचा...
आला सण होळीचा
किती बघा होतो आनंद
बालगोपाळ सारे
रंग उधळती स्वच्छंद...१
हुताशनी पौर्णिमा
करूया आपण साजरी
प्रेमरंगी रंगूनी
वसुधा लाजली लाजरी ....२
होलीका पुजू चला
एकीची शपथ घेऊया
ओटी भरूनी मग
साखरेचे फुगे देऊया...३
काढूया मनातून
मोहमाया मत्सर द्वेष
होळीत जाळूनिया
राख करूया दुष्ट क्लेष....४
आगीमध्ये दहन
करूया सारे कुविचार
रंग लावू प्रेमाचा
मनी आणूया सुविचार...५
पाण्याचा अपव्यय
टाळूनी लावू सुका रंग
नाचू गाऊ खेळूया
सवंगड्यात होऊ दंग...६
जपूया परंपरा
करू साजरा होळी सण
उत्साहाने सजवू
मांगल्याचा सुखद क्षण...७
सौ.शरयु पाम्पट्टीवार.
दिग्रस, यवतमाळ.
.jpg)